Serialsshradhasthan

पुजारी सोडून गेले, गोशाळेवरही परिणाम ;श्रीराम मंदिराची परिस्थितीshradhasthan

जालना -जुन्या जालन्यातील आनंदवाडी येथे असलेल्या श्रीराम मंदिर संस्थान मधील भाविकांची संख्या घटली आहे, आणि याचा अप्रत्यक्ष परिणाम संस्थांनमध्ये सुरू असलेली गोशाळा आणि कर्मचाऱ्यांवर झाला आहे.

रेल्वे स्थानकापासून जवळच असलेल्या या श्रीराम मंदिरामध्ये गुढीपाडवा ते श्रीराम नवमी दरम्यान मोठा उत्सव असतो.  या काळात रोज पाच ते दहा हजार भाविकांना अन्नदानही केले जाते . गेल्यावर्षी या मंदिराला एकशे पंचवीस वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे मोठ्या उत्साहात -आनंदात मंदिर परिसरामध्ये

सभामंडप, बगीच्या, दिवाबत्ती,  रंगरंगोटी तसेच सुशोभीकरण यावरही भर दिला होता. मात्र उत्सव साजरा न झाल्याने भाविकांच्या आनंदात विरजण पडले.  कोणताही उत्सव गेल्या दोन वर्षात येथे साजरा झाला नाही.

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी स्थापिन केलेले हे राम मंदिर आहे. खरंतर रेे साडेतीनशे वर्षांपूर्वी भैरवनाथाचे मंदिर आहे परंतु भैरवनाथांच्या्या ठिकाणी वारंवार रामरायालाा इथे स्थापन करावेे असे संकेत काहीी भक्तांना मिळत गेल्याचे सांगण्यात येते त्यानुसार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर यांनी स्वतः येथील श्रीरामांचीी प्राणप्रतिष्ठा केली आहे . जालन्यासह इतर जिल्ह्यातूनही येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे .या भाविकांसाठी येथे निवासाची आणि प्रसादाची ही व्यवस्था आहे ,मात्र कोरोनाचा काळ असल्यामुळे ही निवास व्यवस्था आणि प्रसाद व्यवस्था बंद केली आहे. या दोन व्यवस्थे व्यतिरिक्त पुजारी देखील इथे कायमस्वरूपी असतात, मात्र कोरोनाच्या काळात ते देखील सोडून गेले आहेत. परंतु नित्योपासना काही बंद ठेवता येत नाही .त्यामुळे ही जबाबदारी मंदिराच्या विश्वस्तांना सांभाळावी लागत आहे. मंदिरात बंद असल्यामुळे येणाऱ्या भाविकांची संख्या रोडावली आहे आणि याचा परिणाम श्रीराम मंदिर संस्थांनच्या गो शाळेवर ही झाला आहे. मंदिर सुरू असल्यानंतर भाविक देखील या गोशाळेसाठी दान- धर्म आणि चाऱ्याची व्यवस्था करतात.  आता ती पण बंद असल्याची माहिती मंदिराचे विश्वस्त कल्याण महाराज आचार्य यांनी दिली आहे. मंदिरामध्ये बाराही महिने काकड आरती पासून अभिषेक, माध्यन्य आरती ,उपासना, शेजारती हे नित्य कार्यक्रम होतात .याव्यतिरिक्त देखील गुरुपौर्णिमा प्रल्हाद महाराजांच्या उत्सवाच्या निमित्ताने इथे भजन, कीर्तन आणि ग्रंथाचे वाचन देखील केले जाते, मात्र त्यावर देखील त्यावरही बंधन आल्यामुळे भाविकांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचेही कल्याण महाराज आचार्य यांनी सांगितले.

दरम्यान मंदिरे कधी उघडतील याचा काहीच अंदाज नसल्यामुळे मागील दीड वर्षापासून झालेले नुकसान भरून काढायचे कसे या विवंचनेने मध्ये विश्वस्त आहेत.

*ताज्या  आणि सविस्तर बातम्या पहाण्यासाठी डाउनलोड करा edtv jalna app*9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button