Advertisment
जालना जिल्हा

सर्पमित्रांनी पकडलेल्या सापांचे पुढे काय होते?

जालना-नागपंचमी म्हटले की डोळ्यासमोर येतात  साप. खरेतर हे प्राणी मित्र आहेत. जोपर्यंत तुम्ही त्यांना त्रास देत नाहीत तोपर्यंत ते देखील तुम्हाला त्रास देत नाहीत. मात्र केवळ गैरसमजामधून या  सापांचा बळी घेतला जातो. परंतु त्यांना जीवदान देण्याची महत्त्वाची भूमिका हे सर्पमित्र करीत आहेत. या सर्पमित्रांच्या जीवालाही धोका आहे परंतु  सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी सर्पमित्र आपल्या जीवाची बाजी लावतात ,मात्र सरकार दरबारी त्यांना मानधन तर सोडाच साधे विमा कवच देखील नाही . मात्र सर्पमित्र हे वनसंरक्षकाच्या माध्यमातून त्यांनी पकडलेले सापांचा वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसमोर पंचनामा करून जंगलात सोडून देतात आणि त्याची नोंद करून ठेवतात.

वन्यप्राण्यांना मारणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे. मात्र नागरिक जिवाच्या भीतीने साप दिसताच त्याला मारायला धावतात. अशावेळी साप आणि नागरिक या दोघांच्या जीवाची काळजी घेणारे सर्प मित्र धावून येतात.  या सर्पमित्रांची नोंदणी वनविभागाकडे असायला हवी, आणि त्यांना कळविल्यानंतर वनविभागाने या सर्पमित्रांच्या माध्यमातुन साप पकडून त्यांना पुन्हा जंगलात सोडायला हवे. मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये अशा कोणत्याही सर्पमित्रांची नोंद शासनाकडे नाही. त्यामुळे केवळ सामाजिक बांधिलकी म्हणून हे सर्पमित्र काम करत आहेत. आणि किमान जाण्यायेण्याचा खर्च तरी मिळावा एवढीच त्यांना अपेक्षा आहे. मात्र अनेक वेळा ती देखील पूर्ण होत नाही. अशा या धोक्याच्या ठिकाणी काम करताना सरकारने किमान विमा कवच तरी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी सर्पमित्र फरीद यांनी केलीआहे.     दरम्यान साप दूध पितात? या अंधश्रद्धेबद्दल बोलताना सर्प मित्र तथा शिक्षक ज्ञानेश्वर गिराम यांनी सांगितले की साप कधीही दूध पीत नाहीत. गारुडी दूध मिश्रित पाणी पाजुन दूध पाजल्याचा आभास निर्माण करतात. साप पकडणे ही एक कला आहे आणि तिचा चुकीच्या ठिकाणी वापर केला तर जीवही जाऊ शकतो. सध्य परिस्थितीत युट्यूब आणि इतर चैनल वर साप पकडण्या विषयी व्हिडिओ पाहून अनेक तरुण अशी स्टंटबाजी करत आहेत. आणि आपला जीव  गमावत आहेत. प्रत्यक्षात साप चावला तरी कुठल्याही पालापाचोळ्याचा, दोरी गंचा उपचार न घेता दवाखान्या मध्ये उपचार घेतला पाहिजे. जेणेकरून जीव वाचेल अशी माहितीही ज्ञानेश्वर गिराम यांनी दिली.

सविस्तर आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी डाऊनलोड करा edtv jalna app,9422219172

 

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button