पोलीस भरती 2019 बाबत महत्वाची सूचना
जालना- पोलीस दलातील शिपाई चालक 25 आणि पोलीस शिपाई 14 या जागांसाठी 2019 मध्ये भरती प्रक्रिया सुरू झाली होती. या प्रक्रियेसाठी उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरले होते 39 जागांसाठी सुमारे पाच हजार अर्ज आले होते. या भरती प्रक्रियेची प्रक्रिया आता पुन्हा सुरू झाली आहे .ज्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरले आहेत त्यांचे ई-मेल आणि पासवर्ड बदलण्यासाठी तीन ऑगस्टला 2021 ला पोलीस प्रशासनाने जाहिरात दिली होती, मात्र अद्याप पर्यंत अनेकांनी हे पासवर्ड आणि ईमेल बदलले नसल्याचे लक्षात आले आहे. त्या अनुषंगाने पोलिस प्रशासनाने आवाहन केले आहे की ,अद्याप पर्यंत ज्या उमेदवारांनी बदल केलेला नाही त्या उमेदवारांचे परीक्षेचे प्रवेश पत्र उपलब्ध नाही. हे उपलब्ध करून घेण्यासाठी ज्यांनी ऑनलाईन अर्ज केला आहे अशा उमेदवारांनी 20 ऑगस्ट 2021 पूर्वी आवश्यक ते बदल करून घ्यावेत .तसेच जे उमेदवार पासवर्ड विसरले आहेत त्यांनी www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर पोलीस कॉर्नर बाणावर क्लिक करून पोलीस भरती 2019 क्लिक करावे आणि ज्या घटकासाठी अर्ज केला आहे ते अद्यावत करावे. तसेच ज्या हा अर्ज दुरुस्त करत असताना उमेदवार खुल्या किंवा आर्थिक दृष्ट्या दुर्बल यापैकी कोणत्या घटकात येतो हे लिहिणे बंधनकारक करण्यात आले आहे.
ताज्या आणि अपडेट बातम्या पाहण्यासाठी डाऊनलोड करा edtv jalna app.
www.edtvjalna.com