Serialsshradhasthan

Covid-19 मुळे नवग्रह मंदिराचे फिरले ग्रहshradhasthan

 

जालना -शहरातील कुंडलिका नदीच्या काठावर नवग्रह मंदिर आहे .नवीन जालन्यातून जुना जालन्यात प्रवेश करत असताना फुलाच्या बाजुलाच नवग्रह मंदिराची कमान आहे.

खरेतर सर्वांनाच ही कमान दिसते मात्र मंदिरात क्वचितच भक्त जातात आणि ते देखील ज्यावेळेस ग्रह फिरतील त्याच वेळेस जातात .त्यामुळे मुळातच मंदिराला फारसे काही उत्पन्न नाही. ग्रह फिरल्यानंतर मात्र माणूस स्वतःहूनच या नवग्रहा मंदिरात जातो आणि त्या माध्यमातून  मंदिराला थोडेफार उत्पन्न होते. मात्र गेल्या दीड वर्षांपासून असलेल्या kovid-19 च्या परिस्थितीमुळे नवग्रह मंदिराचे देखील ग्रह फिरलेले आहेत. वैयक्तिक मालकीचे असलेले हे मंदिर भाविकच येत नसल्यामुळे सुने- सुने झाले आहे .

मंदिर पुरातन असल्यामुळे एकाच छताखाली नवग्रह मंदिर, कुलदेवता, आणि शिवलिंग अशा पद्धतीचे हे मंदिर आहे. मंदिराचे मुख्य विश्वस्त विनोद महाराज व्यास हे येथील कारभार पाहतात .

या मंदिराची माहिती देताना विनोद महाराज म्हणाले की, कोरोनामुळे अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. उत्पन्न तर सोडाच मंदिराचा खर्चदेखील घरातून केल्या जात आहे .घरातून याचा अर्थ इतर ठिकाणी  केलेल्या पूजा पाठाच्या माध्यमातून मिळालेले उत्पन्न आणि भाविकांनी वैयक्तिक दिलेल्या दक्षिणेवर या मंदिराचा डोलारा कसाबसा चालू आहे. भविष्यामध्ये तो भरून काढण्यापेक्षा आहे त्या परिस्थितीत सुधारणा करून मंदिरं सुरू व्हावी  अशीच अपेक्षा आहे .याहीपेक्षा झालेलं नुकसान भरून काढण्यापेक्षा आता पुढे काय करायचं आणि काय नाही हे सर्व देवावर सोडवले आहे. त्यामुळे जोपर्यंत सेवा करता येईल तोपर्यंत करू .असे मतही त्यांनी उद्विग्नपणे मांडले. दरम्यान या नवग्रह मंदिरातील सात वार आणि दोन ग्रह या बद्दल सविस्तर माहितीही त्यांनी दिली. आणि ग्रह फिरण्याची वाट न पाहता भाविकांनी नवग्रहांचे दर्शन घेतले पाहिजे असेही त्यांनी सांगितले.

डाउनलोड करा edtv jalna app  www. edtv jalna. com,    9422219172

Related Articles