जालना- …ते घरातून न सांगताच निघून गेले. त्यामुळे पाच दिवस उपास झाले, मात्र लहान मूल असल्यामुळे शेवटी घरच्यांपुढे माझे काहीच चालले नाही. म्हणून श्रावणात केलेला नियम मोडावा लागला आणि पंधरा दिवसानंतर ते परत आले ते अंगावर जखमा घेऊन. नातेवाइकांनी आणि हितचिंतकांनी त्यांना रेल्वेस्थानकावरून वाजत गाजत आणल्यामुळे आनंद झाला. अंगावर रोमांच उभ्या करणाऱ्या या आठवणी आहेत स्वातंत्र्यसैनिक स्व. वसंतराव विष्णुपंत शेलगावकर यांच्या.त्यांच्या विधवा पत्नी श्रीमती गंगाबाई वसंतराव शेलगावकर यांच्या तोंडून त्या ऐकायला मिळाल्या .
वसंतराव विष्णुपंत शेलगावकर यांचा जन्म 11 जून 1930 ला झाला आणि नववी पास झाल्यानंतर त्यांनी स्वतःला मुक्तिसंग्रामात झोकून दिले. त्यावेळच्या परिस्थितीनुसार ते नववीत असतानाच विवाह झाला होता. आणि दहावीची परीक्षा दिल्यानंतर पत्नीला माहेरी सोडले आणि दहावी पास झालो तरच तुला घेऊन येईल असा गर्भित इशाराही त्यांनी दिला होता. सुदैवाने ते दहावी पास झाले आणि गंगाबाई या वसंतरावांच्या घरी आल्या. सुरुवातीला शिक्षक म्हणून एक वर्षे नोकरी केल्यानंतर त्यांनी लिप्टन इंडिया चहा कंपनीत चहा पत्ती विक्रीचा व्यवसाय केला आणि त्यानंतर स्वतःचे दुकान थाटले हे करत असतांना त्यांना देश प्रेम काही स्वस्थ बसू देत नव्हते. त्यामुळे ते कधी घरी येतील आणि कधी बाहेर जातील याचा काही नेम नव्हता. 1955 मध्ये असेच ते रात्री अकरा वाजता घराच्या बाहेर गेले ते पाच दिवस आलेच नाहीत. श्रावणाचा महिना होता आणि नववधू असल्यामुळे गंगाबाईंनी जोपर्यंत पतीचा चेहरा दिसत नाही तोपर्यंत अन्नग्रहण करायचं नाही असा पण केला होता. त्यामुळे पाच दिवस त्यांना उपास घडले .शेवटी मुलगा लहान असल्यामुळे वडीलधाऱ्या मंडळी पुढे त्यांचे काही चालले नाही आणि हा नियम मोडावा लागला. पाच दिवसानंतर वसंतराव शेलगावकर हे मुक्ती संग्रामासाठी गोव्याला गेले असल्याचे त्यांना कळाले आणि त्यांचा जीव भांड्यात पडला. मात्र त्यांना परत येण्यासाठी पंधरा दिवस लागले आणि ज्या वेळी ती परत आले त्या वेळेस त्यांच्या डोळ्याला,हाताला, जखमा अंगावर जखमा झाल्या होत्या असं जखमी अंग घेऊन ते परत आले. ते परत आल्याचा आनंद सर्वांना झाला होता म्हणून त्यांना रेल्वे स्थानकापासून वाजत गाजत घरी आणल्याच्या आठवणीही श्रीमती गंगाबाई वसंतराव शेलगावकर यांनी सांगितल्या.
दरम्यान पहिली कार सेवा झाली त्यावेळी सध्याचे आयोध्या जिल्हा असलेला हा जिल्हा त्या काळी फैजाबाद जिल्ह्यात होता. या कार सेवेसाठी जालन्याहून ते मनमाड पर्यंत रेल्वेने गेले आणि तिथून पुढे रेल्वे बंद असल्यामुळे विविध मार्गांनी त्यांनी आयोध्य कडे कूच केली .त्यावेळी त्यांचे मित्र नागोराव नाईक, सुखलाल कुंकूलोळ ,राम पोखरकर, भास्करराव बावकर, हे देखील स्वातंत्र्यसंग्राम मध्ये त्यांच्या सोबत असल्याची आठवण वसंतराव शेलगावकर यांचे चिरंजीव कांतराव शेलगावकर यांनी सांगितल्या.मे 2014 मध्ये वसंतराव विष्णुपंत शेलगावकर या स्वातंत्र्य सैनिकाचे वृद्धापकाळाने निधन झाले.
ताज्या आणि सविस्तर बातम्या पाहण्यासाठी डाऊनलोड करा edtv jalna app. www. edtvjalna. com.9422219172