Advertisment
FightersSerials

गोव्याकडे कूच करतांना लोक मदत न करता फक्त नमस्कार करत होते,fighter

 

जालना-गोव्याकडे आगेकूच करत असताना लोक फक्त नमस्कार करायचे, मात्र मदत कोणीही करत नव्हते ,लोकांची इच्छा असतानाही मदत करता येत नाही असे ते आवर्जून सांगत होते. या आठवणी आहेत गोवा मुक्ती संग्रामात सहभागी झालेले स्वातंत्र्य सैनिक सुखलाल फत्तेचंद कुंकूलोळ(जैन) यांच्या.

सन-1955 साली गोवा मुक्ती संग्रामाच्या वेळी गोव्यात जाऊन तेथील तत्कालीन पोलिस प्रशासनाला “गोवा हमारे हिंदुस्तान का है । नही किसी के बाप का ।”असे ठणकावून सांगणारे स्वातंत्र्यसैनिक सुखलाल कुंकूलोळ हे आजही तितक्याच जोशाने घोषणा देतात. त्यांच्या या घोषणेने आजही रक्त सळसळ करतं.7 नोव्हेंबर 1936 साली अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील गडलिंब या छोट्याशा गावी त्यांचा जन्म झाला. भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या वेळी ते केवळ 11 वर्षाचे होते. मात्र तरीही त्यांनी त्या वेळी स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग घेतला. 1957 साली पंतप्रधान इंदिरा गांधी व पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्या घरी भेट देऊन पाठीवर कौतुकाची थाप दिली. हा आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असल्याचे ते सांगतात.यानंतर त्यांनी पुढे काँग्रेस सेवादल मध्ये प्रवेश घेतला. त्यांच्याकडे त्यावेळी मराठवाडा संघटक म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. लढ्याच्या वेळी गोव्यामध्ये गेल्यावर सीमेवरच त्यांना पोलिसांनी त्यांना अडवले. त्यांच्यावर लाठी हल्ले केले मात्र ते मागे हटले नाहीत.गोवा मुक्तिसंग्रामानंतर ते जालना येथे आले आणि येथेच स्थायिक झाले. त्यांनी गुळाचा व्यापार सुरू केला. तसेच सामाजिक कार्याची आवड असल्याने या कार्यातही ते अग्रेसर होते. जालन्यातील काँग्रेस भवन उभारणीमध्ये स्वर्गीय किशनसेठ गोरंट्याल, डॉ. शंकरराव राख, बाळासाहेब पवार यांच्यासोबत यांच्यासोबत त्यांनी खूप मेहनत घेतली. मात्र आता स्वातंत्र्यसैनिकांना म्हणावा तसा योग्य सन्मान दिला जात नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली आहे.

सविस्तर बातम्या पहा edtv jalna aap आणि www. edtv jalna या वेबसाईटवर.

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button