जालना-आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली. या वर्षी आपण अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत आहोत. मात्र एवढी वर्षे झाली असली तरी स्वातंत्र्य लढ्यासाठी सत्याग्रह व त्याग करणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचा संघर्ष काही कमी झाला नाहीये.
“आम्ही सर्वजण अखंड देशाच्या स्वातंत्र्यासाठी भांडलो. मग आता निवृत्तीवेतनासाठी सरकार कडून केंद्र आणि राज्य असा भेदाभेद का? असा सवाल स्वातंत्र्य सैनिक चिन्नय्या शिवलिंग वैभारी यांनी उपस्थित केला आहे. सरकारने असा भेदभाव न करता सर्वांना एकसारखे निवृत्तिवेतन द्यावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.मॅट्रिक पर्यंत शिक्षण घेतलेल्या चिन्नय्या शिवलिंग वैभारी यांना देशभक्तीची मोठी आस होती. विध्यार्थी दशेतच त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला. पुढे ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष झाले. यानंतर ते स्वातंत्र्य लढ्यात अधिकच सक्रिय झाले. त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढा तसेच हैद्राबाद मुक्तीसंग्रामात देखील आपला सहभाग नोंदवला. यावेळी अनेकदा त्यांना कारावास देखील झाला असल्याचे त्यांनी सांगितले.स्वातंत्र्य सैनिक चिन्नय्या शिवलिंग वैभारी यांना मुलगा नाही. दोन मुलीच आहे. सध्या त्यांची लहान मुलगीच त्यांचा सांभाळ करते. मात्र कोरोनाच्या काळात त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती बिकट झाली आहे. त्यांना राज्य सरकारकडून निवृत्तिवेतन मिळत असल्याचे त्यांनी सांगितले मात्र ते अतिशय तुटपुंजे असल्याने त्यांच्या कुटुंबाला मोठी कसरत करावी लागत आहे . त्यामुळे सरकारने केंद्र व राज्य असा भेदभाव न करता सर्वांना सरसकट वेतन द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखविली आहे.
सविस्तर बातम्या पहाण्यासाठी edtv jalna app, किंवा www. edtv jalna वेबसाईट पहा.
942229172