आठ वर्षे घरापासून दूर,fighter

जालना-स्वा. सै. म. शब्बीर म.अली हे मूळचे आंध्रप्रदेशातील जहिराबाद या गावचे. मात्र गोवा मुक्तीसंग्रामच्या वेळी घरदार सोडले. मित्रांसमवेत त्यांनी गोवा मुक्तीसंग्रामात सहभाग घेतला होता. जवळपास 8 वर्षे घरी परतले नसल्याने घरच्यांना त्यांची काळजी वाटत होती. मात्र एकेदिवशी त्यांचा फोन आला आणि घरच्यांचा जीव भांड्यात पडला.
गोवा मुक्तीसंग्रामानंतर ते जालन्यात आले आणि येथेच स्थायिक झाले. पुढे त्यांना राजकारणाची आवड असल्याने त्यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश घेतला. शरद पवार आणि त्यांचे घनिष्ट संबंध होते. नगरपालिका निवडणुकीत त्यांना पक्षाने तिकीट दिले. त्यावर ते नगरसेवक म्हणून निवडूनही आले. एकवेळ ते पाणीपुरवठा सभापती देखील राहिले. त्याकाळी त्यांनी शहराच्या पाणी पुरवठा संबंधी विविध प्रकारच्या उपाययोजना देखील राबवल्या.त्यांना हॉटेल व्यवसायाची देखील मोठी आवड होती. त्यांनी स्टेशन रोडवर रॉयल हॉटेलची सुरुवात केली. नंतरच्या काळात त्यांची तब्येत खालावली. सुरु असलेल्या औषधींचा दुष्परिणाम झाला आणि त्यामुळे त्यांच्या दोन्हीही किडन्या निकामी झाल्या. त्यांना हैद्राबाद येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु 9 नाव्हेंबर 1981 रोजी उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सध्या त्यांच्या पश्चात पत्नी, 6मुले, 4 मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
ताज्या बातम्या पहा edtv jalna app, आणि www. edtv jalna. com वर
9422219172