जालना-भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या वेळी प्रत्येकांमध्ये देशभक्ती हि ओतप्रेत भरून वाहत होती. यावेळी प्रत्येकाने देशासाठी काहीना काही संकल्प केले होते.
असाच एक संकल्प स्वातंत्र्य सैनिक ताराचंद मोहनलाल भंडारी यांनी केला आणि अखेरपर्यंत खादी वापरण्याचा निश्चय केला. तो पूर्ण ही केला.स्वतःचा रंग विक्रीचा व्यवसाय करत असतानाच ताराचंद भंडारी यांना समाजसेवा व देशसेवेचा छंद स्वस्थ बसू देत नव्हता. यामुळे त्त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली. स्वभावाने शांत असले तरी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी अनेक क्रांतिकारी कार्ये केली.प्रसंगी त्यांना काही काळ भूमिगत देखील व्हावे लागल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.विविध सामाजिक संस्था व संघटनेचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. शहरातील श्री. महावीर स्थानकवासी जैन विद्यालय, दृष्टीहीन विद्यालय व जैन इंग्लिश शाळा अशा विविध संस्थाचे ते संस्थापक सदस्य होते. तसेच 1972 साली झालेल्या 25व्या महावीर निर्वाण महोत्सवाचे ते अध्यक्ष होते. त्यावेळीच महावीर स्तंभ उभारण्यात आला. सामाजिक कार्याने सर्वांची मने जिंकणाऱ्या समाजसेवक , निष्ठावान देशभक्त असलेल्या स्वातंत्र्य सैनिक ताराचंद मोहनलाल भंडारी यांनी 26 मे 1998 या दिवशी अखेरचा श्वास घेतला.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व चार मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांची तिसरी पिढी आजही त्यांचा व्यवसाय पुढे चालवत आहे.
ताज्या बातम्या पहा edtv jalna app आणि www. edtv jalna .com वर.9422219172