श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेले शंभू सावरगावshradhasthan
जालना .श्रीराम जेंव्हा वनवासाला निघाले तेंव्हा जालना तालुक्यातील डोंगररांगांमध्ये असलेल्या सेवली -नेर या भागातून ते जात होते. आणि त्रेतायुगात म्हणजे सुमारे सात हजार वर्षांपूर्वी ते काही काळ या भागात थांबले. तिथे शंभू महादेवाची पूजा करत होते. त्यामुळे या भागात असलेल्या शिवालयाला शंभू महादेवाचे नाव पडल्याची आख्यायिका आहे.
दशनाम आखाड्याचे साधू या ठिकाणाचे देखभाल-दुरुस्ती करतात. हरिद्वार येथील देवेंद्र गिरी महाराज सध्या या ठिकाणी आहेत .
स्वार्थ आणि परमार्थ साधायचा असेल तर हे अतिशय सुंदर ठिकाण आहे .निसर्गाच्या सानिध्यात जाऊन रोजच्या धकाधकीच्या जीवनापासून आनंद मिळवून स्वार्थ साधण्यासाठी तर श्रीरामांनी ज्या ठिकाणी पदस्पर्श केला त्या पावन भूमीला दंडवत घालून परमार्थ साधण्यासाठी भाविक इथे येतात.
डोंगर रांगांच्या कुशीत लपलेलं हे शंभू महादेवाचं मंदिर आहे. पुरातन मंदिर, त्या बाजूला दाट झाडी , मोठे वृक्ष त्यांच्या पारंब्या, मंदिराच्या समोरून वाहणारे झुळझुळ पाणी, त्यातच श्रावण सरी मुळे सर्वत्र हिरवा- हिरवा दिसणारा डोंगर, नागमोडी वाट, हा सर्व परिसर मनाला मोहून टाकतो .दशनाम आखाड्याचे साधू येथील पुजारी आहेत. या मंदिराला भाविकांची शिवाय दुसरे उत्पन्नही नाही. गेल्या अठरा महिन्यांपासून बंद असल्या मंदिरामुळे भाविकांनी इथे देखील पाठ फिरवली आहे. त्यामुळे मंदिराला उत्पन्न तर सोडाच साधूंच्या उपजीविकेचा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. मंदिर जरी खुल्या मैदानात असले तरी भाविकच येत नसतील तर काय उपयोग .त्यामध्ये तहसीलदारांनी देखील हे मंदिर बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत ,आणि यामध्ये आणखी एक त्रासदायक बाब म्हणजे परिसरातील मद्यपि या निवांत ठिकाणी येऊन पूूजार्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करतात, मात्र हे साधू खंबीर असल्यामुळे त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होत नाही. श्रीरामांच्या वानरांची सेना देखील येथे मोठ्या प्रमाणात आहे. कदाचित या मंदिराच्या रखवाली साठीची ती असावी असाही समज आहे. कारण मंदिर हे जंगलामध्ये असल्यामुळे वन्य प्राणी आणि अन्य काही धोक्याच्या घंटा पासून भाविकांना आणि पुजाऱ्यांना सावध करण्यासाठी ही वानर सेना कामाला येते.
ताज्या बातम्या पहा edtv jalna app आणि www. edtv jalna .com या वेसाईटवर.