आरोग्य मंत्रांच्या हस्ते राष्ट्रपती पुरस्कारासह विविध पुरस्कारांचे वितरण
जालना -जालन्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते आज विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड ,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदाल, पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, यांच्यासह आमदार कैलास गोरंट्याल, आमदार नारायण कुचे, नगराध्यक्ष सौ संगीता गोरंट्याल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विवेक खतगावकर ,काराग्रह अधीक्षिका अरुणा मुगुटवार आदींची यावेळी उपस्थिती होती. याच कार्यक्रमामध्ये राष्ट्रपती पदक प्राप्त झालेले मध्यवर्ती कारागृहातील हवालदार सिद्धार्थ वाघमारे यांना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात आले. तसेच आरोग्य विभागात काम करणारे डॉक्टर संतोष कडले, डॉक्टर गजानन मस्के, सिद्धार्थ वाघमारे, आदि कर्मचाऱ्यांनाही करुणा योद्धे म्हणून प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच वीर पत्नी, वीर माता ,यांचाही या कार्यक्रमामध्ये शाल श्रीफळ प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
https://play.google.com/store/apps/details?id=com.edtv.jalna www.edtvjalna. com,
9422219172