FightersSerials

स्वातंत्र्यसैनिक आणि डॉक्टर हे राष्ट्र उभे करणारे देवदूतच; ह.भ.प.आनंदगडकर महाराज fighter

 

जालना-डॉक्टर आणि स्वातंत्र्यसैनिकांमुळेच आपण आज  जिवंत आहोत भारत माता आपली माता आहे ,आपला देश आहे हे म्हणण्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्यावर कृपा केली. स्वातंत्र्यसैनिक एक आणि डॉक्टर हे राष्ट्र उभे करणारे देवदूतच आहेत असे गौरवोद्गार  भगवान महाराज आनंदगडकर यांनी काढले.स्व. बाजीराव पाटील चव्हाण बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने स्वातंत्र्यसैनिक आणि कोरना योद्ध्यांच्या सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ,या मान्यवरांचा सत्कार भगवान महाराज आनंदगडकर यांच्या हस्ते झाला.

 

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार अरविंदराव चव्हाण यांची उपस्थिती होती. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावणारे स्वातंत्र्यसैनिक आहेत, आणि ते होते म्हणूनच आज आपण भारत माता की जय असे म्हणतो, हे करत असतानाच गेल्या आठ महिन्यांपासून कोविड च्या काळात आपल्या घरादाराची पर्वा न करता, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रुग्णांच्या कल्याणासाठी अहोरात्र झटणाऱ्या देवरूपी डॉक्टरांची आपल्यावर कृपा आहे.  देहाकडून देवाकडे जाताना हे राष्ट्र लागते आणि या दोघांमुळेच आज हे राष्ट्र उभे आहे .असे गौरवोद्गार देखील आनंद गडकर महाराज यांनी काढले. दरम्यान  हयात असलेले स्वातंत्र्य सैनिक किंवा त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. तसेच कोरोना योद्धे म्हणून  डॉक्टर मंडळींचा सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला.

अरविंदराव चव्हाण

स्वातंत्र्यासाठी ज्यांनी बलिदान दिले अशा स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान करणे हे शासनाचे आणि लोकप्रतिनिधींचे कर्तव्यच आहे. मात्र त्यांनी केला नाही म्हणून आपण जबाबदारी झटकून चालणार नाही .आपणही समाजाचे घटक आहोत. या उद्देशाने या स्वातंत्र्यसैनिकांचा आणि स्वतःचा जीव धोक्यात टाकून रुग्णांसाठी झटणाऱ्या डॉक्टरांचा सत्कार करणेही आपली जबाबदारी समजून या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती माजी आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिली.यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अर्चना भोसले डॉक्टर धारूरकर यांनी मार्गदर्शन केले.

स्वातंत्र्यसैनिकांनी मानले edtv चे  आभार

edtv jalna आणि orbit jalna च्या वतीने स्वातंत्र्यसैनिकांच्या सन्मान आणि गौरव करण्याच्या उद्देशाने पाच प्रतिनिधिक स्वातंत्र्यसैनिकांच्या आठवणींना उजाळा देणारी  “गौरव स्वातंत्र्यसैनिकांचा” ही मालिका केली होती. या मालिकेची दखल घेऊन माजी आमदार अरविंदराव चव्हाण यांनी या स्वातंत्र्यसैनिकांच्या सत्कार समारंभाच्या आयोजन केले.स्वातंत्र्यसैनिकांच्या आठवणींना या मालिकेमुळे आणि या समारंभाच्या निमित्ताने उजाळा मिळाला. स्वातंत्र्यसैनिक सुखलाल जी कुंकूलोळ यांनी या दोन्ही डिजिटल प्रसाद प्रसारमाध्यमांचे आणि आयोजकांचे आभार मानले.

https://play.google.com/store/apps/details?id=com.edtv.jalna

www. edtv jalna. com,  9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button