संस्कार केंद्र बंद असल्यामुळे तरुण पिढी व्यसनाधीन झाली- महंत प्रीतमगिरी महाराजshradhasthan
जालना-धर्म संस्थाच बंद केल्या मग असे प्रकोप तर येतच राहणार! अठरा महिन्यांमध्ये संस्कार करण्याची ठिकाणे सरकारने बंद केल्यामुळे तरुण पिढी व्यसनाधीन झाली आणि covid-19 चे प्रमाण जास्त वाढले .असा आरोप श्री नागनाथ संस्थान नागापूर तालुका जालना येथील महंत प्रीतमगिरी महाराज यांनी केला आहे.
जालना तालुक्यातील नेर सेवली या डोंगररांगांमध्ये सुमारे आठ-दहा हजार वर्षापूर्वीचे पश्चिम मुखी शिवालय आहे आणि या पुरातन शिवालयाचा उल्लेख महर्षी वेदव्यास यांच्या शिवपुराणात असल्याचेही सांगण्यात आले.
अत्यंत जाज्वल्य, आणि जागृत ठिकाण असल्यामुळे इथे भाविकांनी केलेले नवस पूर्ण होतात असा दावाही या महंतांनी केला आहे.
दरम्यान गेल्या 18 महिन्यांपासून सुरू असलेल्या कोरोनामुळे मंदिराच्या उत्पन्नावर परिणाम झाला आणि त्याच्यामुळे विकासावरही परिणाम झाला आहे. सर्वात मोठा दुष्परिणाम म्हणजे तरुण पिढीवर झाला आहे. हाताला काम नसल्यामुळे आणि मंदिरही बंद असल्यामुळे ही तरुण पिढी व्यसनाधीन तिकडे वळली, खरे तर अशा परिस्थितीमध्ये मंदिरे उघडी असायला हवीत, कारण मंदिरामध्ये धर्म शिकविला जातो आणि अप्रत्यक्षपणे संस्कारही केले जातात. संस्कारामधून शांती मिळते, आणि शांती मधून सुख. सुख तेव्हाच मिळते जेव्हा आपण देवाला शरण जातो, मात्र सरकारने देवाला शरण जाणारी ही वाटच बंद केली आहे. उरला प्रश्न मंदिरापेक्षा हॉस्पिटल ची गरज आहे का? ते तर पाहिजेतच पण धर्मच नसेल तर हॉस्पिटल काय कामाचे? धर्मसंस्था मधून निरोगी आयुष्य कसं जगायचं, ते शिकविले जाते. चांगले संस्कार केले जातात. मनाला आणि आत्म्याला शुद्ध करण्याचे हे ठिकाण आहे ,मात्र गेल्या अठरा महिन्यांमध्ये हे संस्कार बंद झाल्यामुळे ही महामारी वाढली असल्याचाही आरोप त्यांनी केला आणि ही महामारी म्हणजे दैवी कोपास असल्याचेही प्रीतम गिरी महाराज यांनी सांगितले.
निसर्गरम्य वातावरणात हे शिवालय आहे .विशेष म्हणजे या शिवालयाच्या प्रांगणातच एक बारव आणि एक हौद शेजारी- शेजारीच आहेत .सध्या परिस्थिती मध्ये या हौदाचे पाणी जमिनीच्या पातळी एवढे आहे मात्र बारवाचे पाणी जमिनीच्या पातळीपेक्षा खूप खोल आहे असे असतानाही उन्हाळ्यामध्ये हा हौद कोरडा पडतो, मात्र बारवाचे पाणी कधीही अटत नाही. ते जेवढे आहेत तेवढेच राहते. असे सांगत असताना महंत म्हणाले की हौदाच्या खाली चाळीस फूट बरवाचे पाणी आणि बारवाच्या खाली चाळीस फूट तलावाचे पाणी आहे .तलाव आटतो ,हौद आटतो मात्र बाराव आटत नाही हा येथील दैवी चमत्कारच आहे.
https://play.google.com/store/apps/details?id=com.google.android.apps.giant
www. edtv jalna. com,9422219172