…..ते काम आमचं नाही- नाना पटोले
जालना- पेट्रोल डिझेल शंभर रुपयांच्या पुढे घेऊन सेंचुरी झाली आता जन आशीर्वाद यात्रा काढून दुसरी सेंचुरी करण्यासाठी जनतेला तयार करणार आहेत का? असा प्रश्न काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले यांनी भाजप सरकारला केला आहे.
त्यासोबतच जन आशीर्वाद यात्रा ही परळीहून काढण्याचे कारण भागवत कराड यांची नियुक्ती झाल्यामुळे पंकजा मुंडे यांचे सांत्वन करण्यासाठी काढली आहे का या प्रश्नाला उत्तर देताना श्री पटोले म्हणाले की, दुसऱ्याच्या घरात झाकून बघायचे काम काँग्रेस करत नाही, ते बीजेपी सरकारचे आहे. फोन टॅपिंग च्या माध्यमातून ते हे करतात. अशा विक्षिप्त मानसिकतेचे लोक देशाच्या राजकारणात येऊन देशाचा सत्यानाश करत असल्याचा आरोपही त्यांनी केला .
*सहा तास ताटकळले पदाधिकारी*
दरम्यान आज सकाळी साडेआठ वाजता जालन्यात आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम तब्बल सहा तास म्हणजे दुपारी अडीच वाजता सुरु झाला. त्यामुळे सकाळपासून ताटकळत बसलेल्या काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हळूहळू काढता पाय घेतला आणि सभागृह ओस पडू लागले. जे पदाधिकारी बाहेरगावाहून आलेले आहेत त्यांना दुसरा पर्याय नसल्यामुळे इथे थांबणे भाग पडले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यानंतर आज पहिल्यांदाच नाना पटोले जालन्यात आले होते. काँग्रेसचे पदाधिकारी बाबुराव मामा सतकर यांच्या घरी भेट दिल्यानंतर मंगल कार्यालयात त्यांचा सत्कार समारंभाचा ही कार्यक्रम झाला. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, शहराध्यक्ष शेख महेमुद आर. आर. खडके पाटील ,प्रभाकर मामा पवार, बाबुराव मामा सतकर, राम सावंत, आदि कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती.
aap-edtv jalna. web-www. edtv. com
9422219172