शेवटी डॉक्टर देखील देवावरच विश्वास ठेवतात ना!shradhasthan
जालना -रुग्णांवर उपचार करून हतबल झाल्यानंतर डॉक्टर देखील शेवटच्या क्षणी देवावर विश्वास ठेवा असेच सांगतात. म्हणजेच तेदेखील देवावर विश्वास ठेवतात. मग आपण का नाही? असा प्रश्न विचारला आहे जालना शहरातील मोदीखाना भागात असलेल्या पंचमुखी हनुमान मंदिराचे व्यवस्थापक असलेले प्रकाशजी श्रीमाळी यांनी.
कोरोनाचे वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन शासनाने मंदिरे बंद केली आहेत. याचा अर्थ डॉक्टरांवर जास्त विश्वास आहे. पण शेवटी डॉक्टरांचा विश्वास हा देवावर आहे. मग मंदिर बंद करून उपयोग काय असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान अठरा महिने मंदिर बंद असल्यामुळे मंदिराचे उत्पन्न तर सोडाच भाविकांवर देखील याचा विपरीत परिणाम होत आहे. खरे तर अशा परिस्थितीमध्ये मन:शांती पाहिजे, मात्र जिथे ही शांती मिळते ते ठिकाणच बंद केले आहेत.
जालना शहरात अशी अनेक प्रार्थनास्थळे आहेत जी प्रसिद्धी पासून अलिप्त आहेत. परंतु जागृत आहेत. त्यातीलच हे एक पंचमुखी हनुमान मंदिर. बहुतांश जालनेकरांना कुंडलिका नदीच्या काठावर असलेले पंचमुखी महादेव मंदिर माहित आहे .मात्र भरवस्तीत असलेले हे मंदिर क्वचितच लोकांना माहित आहे.
राम आणि रावण यांच्यामध्ये युद्ध झाले त्यावेळी हनुमानाने हा पंचमुखी अवतार धारण केल्याची माहिती व्यवस्थापक प्रकाश श्रीमाळी हे सांगतात. हनुमान, नृसिंह, वराह, श्रीविष्णू आणि गरुड,अशी पाच तोंड असलेले पंचमुखी हनुमान मंदिर आहे. हनुमानाच्या पायाखाली मारीच राक्षस देखील येथे आहे. हनुमानाचे आणि शनि महाराजांचे कधी जमलेच नाही. एकाचे तोंड पूर्वेला तर दुसरीच्या तोंड पश्चिमेला असेच असायचे, आणि हीच परिस्थिती या मंदिरात आहे .हनुमानाच्या पाठीला टेकूनच पश्चिमेकडे तोंड करून शनि महाराजांचे मंदिर आहे . हनुमानाच्या बाजूला उत्तरेकडे प्रवेशद्वार असलेले महादेवाचे मंदिर आहे. इथे रोज रंगीबेरंगी आकर्षक फुलांनी आरास केले जाते. अत्यंत सुंदर आणि शांत हे मंदिर आहे .खरेतर हे मंदिर वैयक्तिक मालकीचे आहे. त्यावर कोणाचाही उदरनिर्वाह नाही, मात्र मंदिराच्या देखभाल दुरुस्तीसाठी खर्च तर येणारच! आणि भाविकच नसल्यामुळे हा खर्च काढणे देखील व्यवस्थापकांना जिकरीचे ठरत आहे.
https://play.google.com/store/apps/details?id=com.edtv.jalna
www. edtv jalna. com.9422219172