Advertisment
Serialsshradhasthan

कोरोनामुळे रखडले बालाजी मंदिराच्या प्रसादाला याचे बांधकामshradhasthan

जालना- नियमित आणि खात्रीशीर उत्पन्न असल्याशिवाय विकास होत नाही आणि संस्थाही टिकत नाही हे लक्षात आल्यामुळे सुमारे तीनशे वर्षांपूर्वीचा निजामाने येथील कचेरी रोडवर असलेल्या बालाजी मंदिराची व्यवस्था केली होती. त्या साठी राजूर परिसरात 18 एकर शेत या बालाजी मंदिराला इनाम म्हणून दिले होते. ज्या शेताच्या उत्पन्ना मधून आजही मंदिराचा वार्षिक उत्सव, दिवाबत्ती, आणि स्वच्छता केली जाते. त्याच्या जोडीला भाविकांचाही हातभार लागत असल्यामुळे मंदिराच्या विकास कामांना गती घेतली होती. मात्र covid-19 मुळे या मंदिराच्या प्रसादालयात चे काम रखडले आहे

मुख्य रस्त्यावर मंदिर असल्यामुळे भाविक सहज या मंदिरात जात -येत होते आणि त्या माध्यमातून दानपेटीत भर पडत होती. मात्र गेल्या 18 महिन्यांपासून भाविकच नाहीत आणि दानपेटी रिकामी आहे. त्यामुळे केवळ इनाम जमिनीमधून झालेल्या उत्पन्नावरच हा खर्च चालू आहे आणि त्यामध्ये नुकताच झालेला मंदिराचा जीर्णोद्धार आणि सध्या सुरू असलेले विकास कामे यांची सांगड घालताना व्यवस्थापनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. पर्यायाने मंदिराची विकास कामे रखडली आहेत .

जुन्या जालन्यातील कचेरी रोडवर पुरातत्व विभागाच्या नोंदीनुसार 17व्या शतकातील श्री. बालाजी देवाचे देवस्थान आहे परंपरागत विश्वस्त म्हणून गेल्या सहा पिढ्यांपासून देशमुख परिवार सेवा करीत आहे.

मंदिर पुरातन आहे मात्र नुकताच या मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यामुळे मंदिराची भव्य दिव्यता दिसायला लागली आहे. तिरुपती बालाजी बालाजी येथून आणलेली बालाजीची पंचधातूंची मूर्ती, बालाजी च्या एका बाजूला श्रीदेवी आणि दुसऱ्या बाजूला भूदेवी तर त्यांच्या बाजूला पुन्हा अष्टभुजा देवी आणि गरूडेश्वर अशा आकर्षक पंचधातूच्या मूर्तीमध्ये ही देवता स्थापित आहे. देशमुख घराण्याची कुलदेवता म्हणून या मूर्तीच्या बाजूला रेणुका मातेचा आणि दुसऱ्या बाजूला हनुमंताचा भव्य दिव्य तांदळा मनाला प्रसन्न करतो. मंदिरांमध्ये विकास कामे ही झाले आहेत आणि सध्या प्रसाद भवनाचे काम सुरू आहे .मात्र गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाच्या आपत्तीमुळे भाविक आले नाहीत ,ते न येण्याचा अप्रत्यक्ष परिणाम दानपेटी वर झाला आणि दानपेटी रिकामी असल्यामुळे या प्रसादालयात चे काम अर्धवट आहे.

ज्यावेळी मंदिराचा जीर्णोद्धार झाला त्याचवेळी या मूख्य मूर्तीच्या बाजूलाच तीन मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्यामध्ये बालाजी आणि बालाजी च्या दोन्ही बाजू श्री महालक्ष्मी आणि श्री पद्मावती यादेखील उभ्या आहेत. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विजयादशमीला म्हणजेच दसऱ्याला बालाजी महाराजांची पालखी निघते आणि ही पालखी मिरवण्याचा विशेष मान हा गुजराती (पटवी) समाजाला आहे. गेल्या पाच पिढ्यांपासून हा मान त्यांना दिला जातो. मंदिराच्या विकासासाठी येऊन पडलेले बांधकाम साहित्य देखील निधीअभावी पडूनच आहे.

*www. edtv jalna .com*

https://play.google.com/store/apps/details?id=com.edtv.jalna

9422219172

 

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button