लॉयन्स क्लबने केला 450 कोरोना योद्ध्यांचा सन्मान

या वेळी नगराध्यक्षा सौ. संगिता गोरंट्याल लायन्स क्लबचे उपप्रांतपाल पुरुषोत्तम जयपुरिया जयपुरिया, अध्यक्षा मिनाक्षी दाड, सचिव जयश्री लडडा, कोषाध्यक्षा प्रेमलता लोया, अतुल लडडा , विजय दाड , अरुण मित्तल , द्वारकादास मुंदडा, दिनेशजी लोहिया , मोहन राठोड , मिरा राठोड , जगत घुगे, युवराज राठोड यांची उपस्थिती होती.यावेळी मनोगत व्यक्त करताना आ. गोरंट्याल म्हणाले, कोरोना सारख्या महामारी मध्ये जिथे आप्तस्वकीय रक्ताचे नाते सोडून पळाले, तिथे या या योद्ध्यांनी काम केले आहे. स्वतःच्या घरादाराची काळजी न करता इतरांची काळजी करणारे हे खरे कोरोना योद्धे आहेत. लायन्स परिवाराने घेतली दखल ही त्यांच्या कामाची पावतीच आहे.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जगत घुगे यांनी तर आभार गिरीश पाकणीकर यांनी मानले.प्रसंगी लॉ. जगत घुगे यांचा वाढदिवस सर्वांचा उपस्थितीमधे साजरा करण्यात आला.या उपक्रमासाठी प्रकल्प प्रमुख प्रमोद रुणवाल, डॉ. संगिता देशमुख, डॉ. गिरीश पाकणीकर . कुसुम जगत घुगे हे होते.प्रस्ताविक लॉयन अध्यक्षा मिनाक्षी दाड यांनी केले व कार्यक्रमाची रुपरेषा सांगितली.
https://play.google.com/store/apps/details?id=com.edtv.jalna.
www. edtv jalna.com.9422219172