जालना जिल्हा

सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ऊस झाला

जालना :गेल्या तीन दिवसांपासून जालना जिल्ह्यामध्ये पावसाची संतत धार आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला वेळेवर पडलेल्या पावसाने नंतर मात्र दडी मारली आणि शेतकऱ्यांच्या काळजाचे ठोके चुकले. बळीराजा दुबार पेरणीची तयारी करत असतानाच अंतिम टप्प्यात हा पाऊस वेळेवर आलेला आहे. या पावसामुळे सोयाबीनच्या शेंगा भरण्यास मोठी मदत मिळणार आहे तर कापसाला देखील याचा फायदा होणार आहे. वेळेवर आलेल्या पावसामुळे उत्पन्नात मोठी भर पडणार आहे आणि शेतकरी सुखावला आहे.

एकीकडे हे सुख असतानाच दुसरीकडे घनसांगी तालुक्यात काल बुधवारी वारा आणि पाऊस एकत्र आल्यामुळे ऊसाचे मोठे नुकसान झाले आहे. घनसांगी तालुक्यातील बोडखा शिवारामध्ये सुमारे तीनशे एकर ऊस शेतकऱ्यांनी लावलेला आहे. हा ऊस आठ महिन्याचा पोसलेला असल्यामुळे त्याची उंचीही बरीच वाढलेली आहे .उंच वाढलेल्या उसावर वाऱ्याचा दुष्परिणाम झाला आणि हा ऊस आडवा झाला आहे .त्यामुळे या उसा मधून जेवढी साखर निघायला पाहिजे तेवढी निघत नाही. आणि याचा परिणाम उसाला मिळणार्‍या भावावर होतो. एकंदरीत सुमारे 40 टक्के नुकसान या कालच्या वाऱ्यामुळे झाले आहे. बाळासाहेब ढेरे यांनी लावलेला पूर्णच्या पूर्ण दोन एकर ऊस आडवा झाला आहे. अन्य वेळी सुमारे दोन लाख रुपये उसाचे उत्पन्न झाल असतं मात्र आता एक ते दीड लाखाच्या वर हे उत्पन्न जाणार नाही असे बाळासाहेब ढेरे यांनी सांगितले.

https://play.google.com/store/apps/details?id=com.edtv.jalnana.com
www. edtvjalna.com
9422219172

www. edtv jalna.co

 

Related Articles