जालना जिल्हा

जनताच माझे हिरे आणि माणिक मोती- केंद्रीय मंत्री खा. रावसाहेब दानवे

जालना- जनताच माझे हिरे आणि माणिक-मोती आहेत त्यामुळे बोटामध्ये विविध प्रकारच्या अंगठ्या घालून आणि गॉगल लावून फिरण्याची मला गरज नाही अशा अंगठ्या घातल्याने संकट कळत नसतं! याचे याचे उदाहरण म्हणजे मी आहे .माझ्या हातात हिरे माणिक मोत्याची तर सोडाच साधी  अंगठी देखील नाही.

तरी पण माझ्यावर संकट येत नाही. निवडणुकीमध्ये मी दवाखान्यात होतो त्यामुळे नेतेमंडळी माझ्या पश्चात आली आणि माझा प्रचार करून गेली. तरीदेखील मी निवडून आलो याचे कारण म्हणजे जनता आहे. हातातील हिरे माणिक, मोत्यांच्या अंगठ्या नाहीच असा टोला केंद्रीय मंत्री खासदार रावसाहेब दानवे यांनी जिल्ह्यातील दोन नेत्यांना लगावला आहे. मी लोकांमध्ये फिरणारा माणूस आहे म्हणून लोक निवडून देतात याउलट जे लोक निवडून आले ते बोलतात एक आणि करतात येत .त्यामुळे त्यांना घरीही बसावं लागतं .असाही टोला त्यांनी शिवसेनेकडे बोट दाखवून लगावला .

दरम्यान जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने, केंद्रीय रेल्वे मंत्री पदाचा पदभार घेतल्यानंतर पहिल्यांदाच खासदार दानवे हे जालन्यात आले होते. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवतराव कराड, भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा भोकरदन चे आमदार संतोष दानवे, बदनापूर चे आमदार नारायण कुचे ,माजी आमदार विलासराव खरात, आदींची यावेळी उपस्थिती होती.

 भाजपा ची दुसरी पार्टी असलेल्या बबनराव लोणीकर यांच्यासह त्यांच्या गटातील एकही कार्यकर्ता या कार्यक्रमाला उपस्थित नव्हता.
जन आशीर्वाद यात्रेचे जालना शहरात भर पावसात  ठीक-ठिकाणी उत्साहात आणि जल्लोषात स्वागत झाले. अनेक ठिकाणी क्रेनच्या माध्यमातून वजनदार आणि भलामोठा हार या नेतेमंडळींना घालण्यात आला. दरम्यान जालनेकरांच्या सत्काराला उत्तर देताना केंद्रीय मंत्री दानवे यांनी मोदी सरकारने केलेल्या विविध विकास कामांचा पाढा वाचला. तसेच आता रेल्वे मंत्री पदाची जबाबदारी दिल्यामुळे महाराष्ट्रातील रेल्वेच्या समस्या सोडविण्यावर भर असणारच आहे आणि त्या कामाला सुरुवातही झाली आहे. जालना- मनमाड रेल्वे चे दुहेरीकरण आणि इलेक्ट्रिककरण, जालना- खामगाव रेल्वे मार्ग तसेच मुंबई- नागपूर बुलेट ट्रेन यावर ऑक्टोबर महिन्यापासून अभ्यासही सुरू केल्या जाईल अशी माहितीही मंत्री दानवे यांनी दिली.

दरम्यान स्थानिक राजकारणावर बोलताना त्यांनी परतूरचे आमदार बबनराव लोणीकर आणि शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्यावरही मिस्कील भाषेत टीका केली.  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या “माझे कुटुंब माझी जबाबदारी” या उपक्रमाचा चांगलाच समाचार घेतला.

नवनिर्वाचित केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनीदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामांचा पाढा वाचून दाखवा त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा भोकरदन चे आमदार संतोष दानवे बदनापूर चे आमदार नारायण कुचे यांचीही समयोचित भाषणे झाली.

https://play.google.com/store/apps/details?id=com.edtv.jalnana.com
www. edtvjalna.com
9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button