जालना जिल्हा

मराठवाड्याच्या वाट्याला आलेल्या दोन्ही केंद्रीय मंत्र्यांची संयुक्त पत्रकार परिषद

जालना -मराठवाड्याच्या वाट्याला दोन केंद्रीय मंत्री आले आहेत. त्यामध्ये एक आहेत केंद्रीय रेल्वे मंत्री खासदार रावसाहेब दानवे तर दुसरे आहेत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड. या दोघांनी आज सकाळी संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि जन आशीर्वाद यात्रा चे फलित सांगत, गॅस दरवाढ आणि नारायण राणे यांनी केलेल्या अभिवादनानंतर शिवसेनेने स्मृतिस्थळाचे केलेले शुद्धीकरण याविषयी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तरे दिली.

दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या वतीने जन आशीर्वाद यात्रेमध्ये 100 रुपयात महिलांना गॅस दिल्याची टिमकी वाजवली. मात्र गॅसचे भाव साडेनऊशे रुपयांपर्यंत गेले याविषयी कुठेही वाच्यता केली गेली नाही. या प्रश्नाला हात घातला असता केंद्रीय अर्थमंत्री डॉ. भागवत कराड यांनी गॅस दरवाढ झाल्याची माहिती आहे मात्र आत्ताच तर यावर तोडगा निघेल याची शक्यता कमीच असल्याचे सांगितले. कारण हा धोरणात्मक निर्णय पूर्ण देशासाठी लागू होईल आणि त्यावर विचार विनिमय करूनच निर्णय घेतला जाईल असेही ते म्हणाले. दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाला अभिवादन केल्यानंतर शिवसेनेने लगेच या ठिकाणाचे शुद्धीकरण केले आहे. या प्रकाराबद्दल खासदार रावसाहेब दानवे म्हणाले की, सार्वजनिक ठिकाणी जाती-धर्म किंवा राजकीय पक्षांना बंदी घालता येत नाही. बाळासाहेब ठाकरे हे जनमान्य नेतृत्व होतं त्यामुळे त्यांना कोणीही अभिवादन करू शकतो. अशा शुद्धीकरणाचे घृणास्पद प्रकार फक्त शिवसेनाच करू शकते असेही ते म्हणाले.
मराठवाड्याच्या विकासासंदर्भात डॉ. कराड म्हणाले की दोन वर्षे विकास परिषदेचे अध्यक्षपद भूषवले आहे. त्यानंतर आघाडी सरकार आले आणि ही परिषद रद्द झाली. खरं तर या मराठवाडा विकास परिषदेला मुदतवाढ द्यायला हवी होती. मात्र राज्य सरकारने ते केले नाही. अजूनही राज्यसरकारने राज्यपालांकडे मुदतवाढ मागावी आणि राज्यपाल केंद्राकडे त्याची शिफारस करतील आणि या मराठवाडा विकास परिषदेला मुदतवाढ मिळेल. या माध्यमातून मराठवाड्याचा विकास होईल अशी मागणी त्यांनी केली आहे.

https://play.google.com/store/apps/details?id=com.edtv.jalnana.com
www. edtvjalna.com
9422219172 -dilip pohnerkar

 

 

 

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button