राज्य

समृद्धी महामार्गावर अपघात 13 कामगार ठार

जालना -मुंबई -नागपूर या समृद्धी महामार्गावर आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास अपघात झाला.या अपघातामध्ये 13 कामगार मृत्युमुखी पडल्याची दुर्घटना घडली आहे. या महामार्गावर काम करणारे कामगार सकाळी नियोजित कामाच्या ठिकाणी गेले होते, मात्र पाऊस सुरू झाल्याने हे कामगार अकरा वाजेच्या सुमारास पुन्हा घराकडे परतू लागले. दरम्यानच्या काळात मोठ्या ट्रक मध्ये लोखंडाचे तुकडे होते आणि या तुकड्यावर हे कामगार बसून घराकडे परतत होते. एका वळणावर या या ट्रकचे चाक घसरले आणि पूर्ण ट्रक उलटला.

यामध्ये  असलेले गज या कामगारांच्या अंगात घुसले . परिसरातील गावकऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि हे कामगार बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र अवजड वाहन असल्यामुळे ते त्यांना शक्य झाले नाही. शेवटी क्रेनच्या माध्यमातून हा ट्रक बाजूला केला तोपर्यंत तेरा कामगारांनी आपला जीव सोडला होता. या सर्व कामगारांना परिसरातील नागरिकांनी जालना येथील सामान्य रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी आणले आहे दरम्यान अन्य दोन कामगार खाजगी रुग्णालयात भरती केले आहेत त्यांची देखील प्रकृती अत्यवस्थ असल्याचे सांगण्यात आले.
हे सर्व कामगार परप्रांतीय आहेत त्यामुळे त्यांची जोपर्यंत ओळख पटत नाही किंवा त्यांच्या नावाचे पुरावे मिळत नाही तोपर्यंत त्यांची उत्तरे तपासणी होऊ शकत नाही त्यामुळे या 13 जणांचे मृतदेह सध्या जालना येथील शासकीय रुग्णालयाच्या शवागारात आहेत.

https://play.google.com/store/apps/details?id=com.edtv.jalnana.com
www. edtvjalna.com
9422219172,दिलीप पोहनेरकर,

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button