आनंदी स्वामींची यात्रा न झाल्यामुळे बारवर समाजाचे दोन वर्षाचे उत्पन्न बुडालेshradhasthan
जालना -गेल्या दोन वर्षांपासून आनंदी स्वामी महाराजांची आषाढी एकादशी ची यात्रा न भरल्यामुळे बरवार(सुतार) समाजाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. आषाढी एकादशीनिमित्त श्री आनंदी स्वामी महाराजांची सात दिवस यात्रा भरते. जुन्या जालन्यातील शनी मंदिर पासून आनंदी स्वामी नावाची एक गल्ली आहे, आणि या गल्ली मध्ये पूर्ण सात दिवस ही यात्रा भरते.
या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे बरवार समाज हा लाकडी साहित्य विक्रीसाठी आणतो .covid-19 मुळे 2020 आणि 2021 अशा दोन्ही वर्षाच्या आषाढी एकादशीच्या यात्रा भरल्याच नाहीत . याचा मोठा फटका या समाजाला बसला आहे. आनंदी स्वामींची यात्रा म्हटले की लाकडी साहित्य खरेदी करण्याची चंगळ असते .
तुरुतुरु चालणाऱ्या बाळाला लागणारा पांगुळ गाड्या पासून चौरंग विविध खेळण्या ते महिलांना लागणाऱ्या पोळपाट लाटण्या पर्यंत सर्व काही लाकडी साहित्य येथे मिळते. विशेष म्हणजे हे सर्व साहित्य बरवार समाज हाताने बनवून यात्रेमध्ये विक्रीसाठी ठेवतो .त्यामुळे आनंदी स्वामींची यात्रा म्हटले कि लाकडी साहित्याची धूम .हे जणू काही समीकरणच झाला आहे .वर्षभर होणारा धंदा एकीकडे आणि या सात दिवसात होणारा धंदा एकीकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात लाकडी साहित्याची विक्री होते. ही विक्री न झाल्यामुळे या समाजाला मोठा फटका बसला आहे.
या समाजाप्रमाणेच मंदिराचेही झाले आहे. बारा महिने भाविक येतात आणि यथाशक्ती आपले दान दानपेटीत टाकतात .परंतु आषाढी एकादशीच्या निमित्ताने पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत पालखीची होणारी नगरप्रदक्षिणा ही वर्षभरासाठी जमापुंजी ची व्यवस्था करून ठेवते. दोन वर्षांपासून ही जमापुंजी देखील जमा झाली नाही. दत्तात्रेयांचे अवतार म्हणून श्री आनंदी स्वामी महाराज सर्व परिचित आहेत. सुमारे तीनशे वर्षांपूर्वीचे पुरातन मंदिर आहे या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे पाच मजले असतानाही सर्व काम लाकडामध्ये केलेले आहे. आकर्षक झुंबर आणि मंदिराच्या चारी बाजूंनी पाच मजले असलेल्या माड्या भाविकांना पुन्हा-पुन्हा येथे येण्यासाठी भुरळ घालतात. मंदिरात आषाढी एकादशी पूर्वी सातही दिवस येथे विविध धार्मिक कार्यक्रम घेतले जातात ,आणि त्या माध्यमातून रोज अन्नदान हि केले जाते .मागील वर्षी तर मंदिरा पासून अन्नदाना पर्यंत शंभर टक्के सर्व काही बंद होते. परंतु यावर्षी covid-19 चा प्रभाव अधिक होता,मात्र तीव्रता कमी असल्याने प्रशासनाने शेवटच्या टप्प्यात नियम आणि अटी घालून पालखीला परवानगी दिली होती. त्यामुळे दहा टक्के का होईना मंदिराला उत्पन्न मिळाले आहे.
https://play.google.com/store/apps/details?id=com.edtv.jalnana.com
www. edtvjalna.com
9422219172