जालना जिल्हा

संस्कृत भाषा सर्व भाषांची जननी- मीनाक्षी दाड

जालना-आज जगात ६९०० भाषा बोलल्या जातात या सर्व भाषांमध्ये संस्कृत हि प्राचीन भाषा असल्यामुळे ती सर्व भाषांची जननी आहे. संस्कृत भाषा हि एक शास्त्रीय भाषा आहे. संस्कृत भाषेला देववाणी आणि सूर भारती देखील संबोधले जाते असे प्रतिपादन  लॉयन्स क्लब जालना च्या अध्यक्षा मीनाक्षी दाड यांनी केले.
संस्कृत भाषा प्रचार समिती,जालना संचालित श्रीराम संस्कृत विद्यालय व ग्रंथ संग्रहालय श्रीराम वाचनालय,जालना यांचा संयुक्त विधमाने ग्रंथ संग्रहालय श्रीराम वाचनालयाच्या “श्रीरामशास्त्री सांस्कृतिक सभागृहा” मध्ये संस्कृत दिनानिमित्तने त्या बोलत होत्या.   तीन दिवसीय संस्कृत ग्रंथाच्या ग्रंथप्रदर्शनाप्रसंगी मीनाक्षी दाड उद्घाटक म्हणून बोलत होते.


याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षा संस्कृत शिक्षिका तथा संस्कृत भाषा प्रचार समितीच्या उपाध्यक्ष जयश्री कुलकर्णी,प्रमुख पाहुणे म्हणून महेश सेवा ट्रस्ट चे उपाध्यक्ष विजयकुमार दाड,ग्रंथ संग्रहालय श्रीराम वाचनालयाचे अध्यक्ष कैलास बियाणी, श्रीराम वाचनालयाचे उपाध्यक्ष संस्कृत पंडित सुधाकर भालेराव, श्री भगवती पुरोहित संघाचे जिल्हा कार्यअध्यक्ष संस्कृत पंडित,ज्योतिषाचर्या तथा सत्कारमूर्ती राजेश सामनगावकर, श्रीराम वाचनालयाचे सचिव श्रीकांत शेलगावकर यांची उपस्थिती होती.
मान्यवरांच्या हस्ते सरस्वती देवीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.  मीनाक्षी दाड पुढे म्हणाल्या की, संस्कृत हि आपल्या पूर्वजांची आणि प्राचीन ऋषीची मातृभाषा आहे. संस्कृत भाषा हि कठीण आहे असे समजून आपण याकडे दुर्लक्ष करतो, परंतु दुर्लक्षष न करता  संस्कृत भाषेचा प्रचार प्रसार करून संस्कृत भाषेचे जतन करणे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. ग्रंथ प्रदर्शनाच्या माध्यमातून संस्कृत भाषेचे साहित्य सर्वांपर्यंत पोहोचाविल्या बद्दल त्यांनी संस्थेचे अभिनन्दन केले.
सत्कारपर मनोगत व्यक्त करताना राजेश सामनगावकर म्हणाले कि,  संस्कृत स्पर्धा,वाचनालयामुळे चांगले विद्याथी घडत असून संस्थेचा उपक्रम उत्कृष्ट आहे. संस्कृत भाषा, ज्योतिषाशात्र सर्व व्यक्तीसाठी शिकण्याची मुभा आहे. २७ नक्षत्र व नवग्रहाचा मानवी जीवनावर होणाऱ्या परिणाम विषयी सविस्तर माहिती दिली.
अध्यक्षीय समारोप प्रसंगी मनोगत व्यक्त करतांत जयश्री कुलकर्णी म्हणाल्या कि, ग्रंथ प्रदर्शनामुळे जुने संस्कृत ग्रंथ पाहायला मिळाले. संस्कृत भाषा अभिजात भाषा आहे. हिंदू धर्मातील जवळ पास सर्वच धर्म ग्रंथ तसेच जैन व बौद्ध ग्रंथ संस्कृत भाषेतून आहे. संस्कृत भाषा ही भारताची ज्ञान भाषा आहे. रोजच्या जीवनात आपण संस्कृत भाषेचा कश्या प्रकारे उपयोग करतो हे उदाहरण देऊन सांगितले. संस्कृत भाषेच्या अध्यानाने स्मरण शक्ती मध्ये वाढ होते. संस्कृत भाषेमध्ये एका शब्दास खूप समानार्थी शब्द आहेत. संस्कृत भाषेमध्ये शब्द कोणत्याही क्रमाने ठेवले तरी वाक्याचा अर्थ बदलत नाही कारण हे शब्द विभक्ती नुसार वापरलेले असतात. संस्कृत भाषेमुळे राष्ट्रीय एकात्मता वाढते.
याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांनी संस्कृत गीत,श्लोक,स्तोत्राचे सादरीकरण केले. संस्कृत भाषेच्या प्रचार प्रसारासाठी केलेल्या कार्याबद्दल व ज्योतिष विषयात विद्यावाचस्पती पदवी प्राप्त केल्याबद्दल संस्कृत पंडित राजेश सामनगावकर याचा विशेष सत्कार करण्यात आला.
सूत्रसंचालन शाम शेलगावकर यांनी तर आभार अनघा भावठाणकर यांनी मानले. याप्रसंगी मोहिनी शेलगावकर,नितीन बावणे,प्रल्हाद बिल्लारे,सय्यद युनूस,सखाराम बोरूळ,रामेश्वर चौंडीये,सुभाष घारे,प्रमोद जोशी,शैलेंद्र बदनापूरकर यासह संस्कृत प्रेमी वाचक उपस्थित होते.

https://play.google.com/store/apps/details?id=com.edtv.jalnana.com
www. edtvjalna.com
दिलीप पोहनेरकर,9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button