पुजाऱ्यासोबत वाद नको म्हणून भाविकांच्या हातांनीच आरतीshradhasthan

जालना- शासनाने आदेश दिल्यामुळे बंद असणारी मंदिरे आणि भाविकांची संपत जाणारी सहनशीलता या दोन्ही प्रकारामुळे पुजारी अडचणीत येत आहेत.
भाविक आणि पुजारी यांच्यामध्ये वाद होत आहेत. अशा घटनांना आळा घालण्यासाठी भाविकांच्या हातानेच आरती करण्याचा निर्णय रेणुका माता संस्थान सोमठाणा यांनी घेतला आहे. त्यामुळे काही प्रमाणात या वादाला आळा बसला आहे.
सकाळ दुपार संध्याकाळ अशा तिन्ही वेळी या मंदिरात आरती होते. जालना औरंगाबाद रस्त्यावर बदनापूर शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर हे रेणुका मातेचे संस्थान आहे. पायथ्याशी भव्य तलाव आणि डोंगरावर हिरवळीत नटलेलं हे ठिकाण आहे. देवीच्या डोंगराच्या पाठीमागून समृद्धी महामार्ग जात असल्यामुळे निसर्गाच्या सौंदर्यामध्ये आणखीनच भर पडली आहे त्यामुळे दर्शना सोबतच भाविक पर्यटनासाठी देखील इथे येतात.
सहाजिकच दुरून आल्यानंतर जर देवीचे दर्शन होत नसेल तर भाविकांची सहनशीलता ही संपत आहे. पुजाऱ्यांसोबत सोबत वाद वाढायला सुरुवात झाली आहे. या प्रकारांना आळा घालण्यासाठी संस्थानचे अध्यक्ष राजेंद्र जयस्वाल यांनी सकाळ, दुपार, संध्याकाळ फक्त आरतीच्या वेळीच मंदिर उघडून भाविकांच्या हस्ते आरती करण्याचा निर्णय घेतला आहे. उर्वरित वेळेत हे मंदिर बंदच असते. त्यामुळे भाविकांना बाहेरूनच दर्शन घेऊन परतावे लागते. त्यासोबत दिवसभर भाविक आणि पुजाऱ्यामध्ये वाद होऊ नये म्हणून मंदिराचे उपाध्यक्ष बाबुराव कोल्हे हे देखील दिवसभर येथेच असतात. मंदिराचे मुख्य उत्पन्न म्हणजे नवरात्रामध्ये इथे भरणारी जत्रा .गेल्या दोन वर्षांपासून ही जत्रा भरली नाही त्यामुळे उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे.
परिसर भव्यदिव्य असल्यामुळे साफसफाई आणि रखवालीचाही मोठा प्रश्न आहे. याला एक कायमस्वरूपी उत्पन्न म्हणून संस्थानच्यावतीने परिसरात सभागृह आणि बगीच्या देखील केलेला आहे मात्र सध्या कोविड काळामुळे बगीचा करून भाविकांना त्याचा उपयोग होत नाही तर सभागृहात धार्मिक आणि अन्य कोणतेच कार्यक्रम होत नसल्यामुळे त्याचेही उत्पन्न बुडाले आहे. मंदिराच्या बाहेर फूल प्रसादाचे दुकान नसल्यामुळे त्यामधून देखील काहीच उत्पन्न मिळत. नाही पर्यायाने हा खर्च चालवायचा कसा? हा मोठा प्रश्न मंदिर व्यवस्थापनावर आहे.
https://play.google.com/store/apps/details?id=com.edtv.jalnana.com
www. edtvjalna.com
दिलीप पोहनेरकर,9422219172