सोन्या-चांदीची रोज चार कोटींची उलाढाल: आज बंद
जालना- हॉलमार्किंग चा कायदा अमलात आणण्यासाठी शासनाने पुरेसा कालावधी द्यावा आणि कारकुनी कामे कमी करायला लावावीत, या मागण्यांसाठी आज जालना जिल्ह्यात सराफा व्यापार्यांनी बंद पुकारला होता.
श्रावण महिना सुरु आहे आणि सणासुदीचे दिवस चालू आहेत. कालच राखी पौर्णिमा झाली, सर्व सणांच्या पार्श्वभूमीवर सराफांच्या दुकानात गेल्या महिनाभरापासून प्रचंड गर्दी आहे असे असताना आज सराफा व्यापार्यांनी बंद पुकारून शासनाच्या धोरणाचा निषेध केला. केंद्र शासनाने सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग बंधनकारक केले आहे. मात्र हा कायदा अजून जालना जिल्ह्यात लागू झालेला नाही .परंतु प्रशासकीय यंत्रणा त्या पद्धतीने काम सुरू करीत आहे. त्यामुळे हा कायदा लागू करण्यापूर्वी कायद्यात असलेल्या त्रुटी दूर कराव्यात या मागणीसाठी आजचा हा बंद होता .
दागिन्यांवर हॉलमार्किंग करायला सराफांचा विरोध नाही मात्र शासन सराफांकडे सध्या असलेल्या दागिन्यांवर देखील हॉल मार्किंग करायला लावत आहे, जे की प्रत्यक्षात अशक्य आहे. त्याच सोबत अतिरिक्त मनुष्यबळ लागणार आहे हे मनुष्यबळ देखील तयार करावे लागणार आहे आणि त्यासाठी सुमारे दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागेल असा अंदाज या व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे जोपर्यंत प्रशासकीय बाब पूर्ण होत नाही तोपर्यंत हा कायदा लागू करू नये अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यान जालना जिल्ह्यामध्ये दररोज सोन्या-चांदीच्या व्यवहारात सुमारे चार कोटी रुपयांची उलाढाल होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात उलाढाल असलेला हा व्यवहार आज एका दिवसासाठी ठप्प झाला होता. हा व्यवहार ठप्प झाल्यामुळे व्यापाऱ्यांचे तर नुकसान झालेच मात्र केंद्र आणि राज्य शासनाचा कर देखील बुडाला आहे.
https://play.google.com/store/apps/details?id=com.edtv.jalnana.com
www. edtvjalna.com
दिलीप पोहनेरकर,9422219172