…या बुद्ध विहार वर झाला नाही कोरोनाचा परिणामshradhasthan
जालना- गेल्या 18 महिन्यांपासून प्रत्येक घटकांवर कोरोनाचा काहीना काही परिणाम करणाऱ्या या महामारीचा काहीच परिणाम नागेवाडी येथील नालंदा बुद्ध विहारावर झाला नाही .
त्या काळात देखील हे बुद्ध विहार सुरू होते .अशी माहिती भदंत अंगुलीमाल शाक्य पुत्र महास्थवीर यांनी दिली.
सरकारने प्रार्थनास्थळे बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र हे प्रार्थनास्थळ नसून माणूस घडविण्याचे ठिकाण आहे .त्यामुळे हे बंद ठेवण्याचा विषयच नव्हता! तरीदेखील प्रशासनाच्या सूचनांचे पालन करत इथे येणाऱ्या साधकांचे हित लक्षात घेऊन आरोग्य विषयीच्या सर्व सूचनांचे पालन केले गेले असेही ते म्हणाले.
जालना औरंगाबाद महामार्गावर जालन्या पासून सहा किलोमीटर अंतरावर नागेवाडी येथे नालंदा बुद्ध विहार आहे. 1983 ला ही जमीन शासकीय शुल्क आकारून सरकारनेही नालंदा बुद्ध विहाराच्या ताब्यात दिली, आणि 1987 पासून इथे बुद्ध विहार सुरू झाले .या बुद्ध विहाराचा खरा विकास झाला 2015 मध्ये.भव्य वास्तू आणि या तीन मजली वास्तू मध्ये दोन भव्य सभागृह .
त्यामध्ये असलेल्या गौतम बुद्धांच्या मूर्तीला पाहून उपसकाचे समाधान होते .सध्य परिस्थितीत ईथे मोठमोठी हिरवीगार झाडे आणि निसर्गरम्य वातावरण आहे. दरम्यान प्रार्थनास्थळापेक्षा हॉस्पिटल ची गरज आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना भदंत म्हणाले, निश्चितच हॉस्पिटल ची गरज आहे,मात्र ते हॉस्पिटल तेथील डॉक्टरांनी सेवाभावाने चालवावे. परंतु सद्य परिस्थितीत हे होत नसल्याचा प्रत्यक्ष अनुभव देखील आपल्या स्वतःला आला असल्याचेही भदंत अंगुलीमाल शाक्य पुत्र महाथेरो यांनी सांगितले. त्यांच्यासोबत भदंत सिवली अंगुलीमाल शाक्य पुत्र हे देखील उपस्थित होते.
https://play.google.com/store/apps/details?id=com.edtv.jalnana.com
www. edtvjalna.com
दिलीप पोहनेरकर,9422219172