Advertisment
Serialsshradhasthan

सरकार कडून मदतीची अपेक्षा नाही मात्र मंदिरे उघडावीतshradhasthan

जालना-मंदिर सोडून बाकी सर्व घटकांवर सरकारचे लक्ष्य आहे. सरकार कडून कोणत्याही मदतीची अपेक्षा नाही, परंतू मंदिरे लवकर उघडली पाहिजेत. जेणेकरून मंदिरावर अवलंबून असणाऱ्या इतर गरजूंचा व्यवसाय सुरू होईल आणि उपजीविका सुरळीत होईल .अशी अपेक्षा व्यक्त केली आहे बडी सडक वर असलेल्या श्रीराम मंदिर संस्थान चे विश्वस्त पं. मनोज गौड यांनी.

जालना शहरातील बडी सडक अर्थात राजेंद्र प्रसाद मार्ग हा एक सर्व परिचित मार्ग आहे. याच रस्त्यावर अत्यंत सुंदर कलाकुसर असलेले श्रीरामांचे मंदिर आहे. 120 वर्षाची या मंदिराला परंपरा आहे. कालानुरूप गेल्या दोन-तीन वर्षांपासून या मंदिरांमध्ये विकासाची ही कामे सुरूहोती .

मात्र गेल्या अठरा महिन्यांपासून ही सर्व कामे बंद आहेत. सुशोभिकरण ही बंद आहे. दानपेटी जर रिकामी आहे तर सुशोभीकरण होणार कसे? या विकासासंदर्भात बोलताना पं. गौड म्हणाले की, महाराष्ट्र सरकारलाच मंदिरांचे काय दुखणं आहे ते कळत नाही?

इतर राज्यात सर्वत्र मंदिरे खुली आहेत. खरे तर मंदिरांमध्ये दिवसभर येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता यापेक्षा कितीतरी पटीने जास्त संख्या ही नेत्यांच्या मागे असते. मंदिरात तरी भाविक येतात आणि जातात गर्दी करत नाहीत नेत्यांच्या मागे मात्र ही गर्दी दिवसभर असते. मग असे निर्बंध मंदिरा साठीच का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. जोपर्यंत देव आहे असे मानणार नाहीत तोपर्यंत कोणत्याही महामारी ला तोंड देऊ शकणार नाहीत. देवाचा आधार आणि परमात्म्याचा आशीर्वाद घेतला तर कोणत्याही गंभीर परिस्थितीला तोंड देता येऊ शकते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान सरकारचे इतर घटकांवर म्हणजेच व्यापारी, उद्योगपती, सरकारी नोकरदार ,राजकारणी, अशा सर्व बाबींवर लक्ष आहे आणि त्यांना योग्य ती सूटही मिळाली आहे . मंदिरांचा सरकारला काय त्रास आहे जे बंद करून ठेवले आहेत. मंदिरे बंद असल्यामुळे मंदिराच्या विकासावर तर परिणाम झाले आहेत मात्र या मंदिरावर अवलंबून असणाऱ्या इतर घटकांवर देखील याचा परिणाम झाला आहे आणि त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

https://play.google.com/store/apps/details?id=com.edtv.jalnana.com
www. edtvjalna.com
दिलीप पोहनेरकर,9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button