1.
राज्य

दहावी पास विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी तंत्रनिकेतचा अभ्यासक्रम आणि परीक्षा होणार मराठी मधून

जालना-गेल्या चार-पाच वर्षांपासून शासकीय तंत्रनिकेतन मधील विद्यार्थ्यांच्या शिल्लक राहणाऱ्या जागा लक्षात घेता शासनाने आता नवीन प्रयोग करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांचा कल या तंत्रनिकेतन कडे वळविण्यासाठी आता शिक्षण आणि परीक्षा दोन्ही मराठी भाषेतून देण्याची व्यवस्था यावर्षीपासून केली आहे .या बदलामुळे दहावीनंतर एकदम इंग्रजी माध्यमामुळे घाबरगुंडी उडालेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. म्हणूनच शासनाने शासकीय तंत्रनिकेतन ची यंत्रणा कामाला लावली आहे. याचाच एक भाग म्हणून जालना जिल्ह्यात असलेल्या जालना आणि अंबड येथील शासकीय तंत्रनिकेतन च्या प्राचार्यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली .

शासकीय तंत्रनिकेतन जालना चे प्राचार्य प्रशांत पट्टलवार आणि अंबड येथील प्राचार्य आदेश जिंतुरकर यांनी शासकीय तंत्रनिकेतन मध्ये उपलब्ध असलेल्या जागांविषयी विस्तृत माहिती दिली. तसेच दहावी नंतर अवघ्या तीन वर्षातच विद्यार्थ्यांना रोजगारक्षम करणारा हा अभ्यासक्रम असल्याचे म्हटले आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर औद्योगिक क्षेत्रामध्ये वर्षाकाठी दोन ते तीन लाख रुपये पगाराची नोकरी मिळू शकते. एवढेच नव्हे तर ती मिळवून देण्यासाठी तंत्रशिक्षण संस्थेमध्ये वेगळी यंत्रणा देखील असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान सध्या या प्रवेशांसाठी दोन्ही प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. दहावीच्या परीक्षांचा निकाल लागला आहे मात्र अनेकांना गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र मिळविण्यात अडचणी आहेत त्यामुळे ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने हे प्रवेश चालू आहेत. शासनाच्या नियमानुसार सर्व सुविधा विद्यार्थ्यांना मिळणार आहेत त्यासोबत या संस्थेमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची देखील व्यवस्था असल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला रसायन अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ मंगेश वाघमारे, यंत्र अभियांत्रिकी अधिव्याख्याता विजयकुमार बुक्का, इंग्रजी अधिव्याख्याता विलास पाठक, अब्दुल वासे सिद्दिकी, यांच्यासह प्रबंधक शंकर पंडित, नंदकिशोर राठोड ,शशिकांत दाभाडकर, विजय साळवे आदींची उपस्थिती होती.

https://play.google.com/store/apps/details?id=com.edtv.jalnana.com
www. edtvjalna.com
दिलीप पोहनेरकर,9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button