जमापुंजीवर सुरू आहेत जगदंबा देवस्थानात विकासाची कामेshradhasthan
जालना –विकासाची जिद्द असेल तर कोरोनावरही मात करता येऊ शकते याचं ताजं उदाहरण म्हणजे जालना तालुक्यातील वाघरुळ येथे असलेलं जगदंबा देवीचे संस्थान .
गेल्या आठरा महिन्यांपासून covid-19 टीमुळे दान पेट्यांमध्ये ठणठणाट आहे , इथे विकास कामे देखील झपाट्याने सुरू आहेत. उत्पन्नाच्या वाढीसाठी येथे बांधलेल्या मंगल कार्यालयात 18 महिन्यांपासून एकही मंगल कार्य पार पडलं नाही किंवा दानशूर भक्तांनी मंदिरात चक्कर ही मारली नाही .
असे असताना देखील पूर्वी भरलेल्या दानपेटीच्या जीवावर इथे विकास सुरू आहे .मात्र आता या दानपेटीतील निधी संपत आल्यामुळे मंदिर व्यवस्थापन देखील काळजी करायला लागले आहेत. मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर जालना देऊळगाव राजा रस्त्यावर जालन्या पासून 20 किलोमीटर अंतरावर डोंगरावर हे संस्थान आहे.
महाराष्ट्रातील हे एकमेव असे ठिकाण आहे कि जिथे जगदंबा आणि रेणुकामाता एकत्र आहेत .दोन्ही देवींचे तांदळे एकाच ठिकाणी एकाच गाभार्यात इथे पाहायला मिळतात. जाणकारांनी सांगितल्यानुसार या दोन्ही देवी डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या वाघरुळ गावात स्थापित होत्या, सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी या देवींची डोंगरावर स्थापना झाली आणि तिथून पुढे सुरु झाला तो परिसराचा विकास .1998 पासून या विकास कामांनी चांगलीच गती घेतली आणि आता हे संस्थान नावारूपाला आले आहे. संस्थानला पर्यटन स्थळाचा “क” दर्जा मिळालेला आहे मात्र अद्याप पर्यंत येथे कसल्या प्रकारचे काम झालेले नाही .परंतु सरकारच्या जीवावर अवलंबून न राहता संस्थनने मंदिर रस्त्यावर वृक्षारोपण केले आहे, त्यासोबत इथे मंगल कार्यालय असल्यामुळे विवाह प्रसंगी मारुती मंदिराची आवश्यकता असते आणि हे मंदिर जगदंबा देवस्थाना पासून दूर म्हणजे पायथ्याशी गावांमध्ये होते. त्यामुळे वराडी मंडळीची गैरसोय होत होती म्हणून याच रस्त्यावर पाच-सहा वर्षांपूर्वी मारुतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली ,मात्र हा मारुती आत्तापर्यंत आभाळाच्या छताखाली होता. आता तेथेदेखील मंदिराच्या बांधकामाची सुरुवात झाली आहे.
कोविडच्या काळा मध्ये मंदिरात असलेली दानपेटी आता रिकामी झाली आहे. त्यामुळे यापुढे एवढा मोठा डोलारा चालवायचा कसा? हा देखील व्यवस्थापनासमोर पेच निर्माण झाला आहे. जागृत संस्थान म्हणून हे ठिकाण प्रसिद्ध असल्यामुळे इथे दान धर्माला कमी नाही. परंतु हे करण्यासाठी देखील मनुष्यबळाची आवश्यकता आहे आणि त्यासाठी तरुण पिढीने या विकास कामात झोकून द्यावे असे आवाहन देखील या मंदिराचे व्यवस्थापक सोनाजी खरात यांनी केले आहे .मंदिराचे मोठे उत्पन्नाचे साधन म्हणजे नवरात्रातील यात्रा महोत्सव गेल्या दोन नवरात्रांत पासून इथे यात्रा भरली नाही .आता तिसरे नवरात्र तोंडावर आहे त्यामुळे नवरात्र पूर्वी तरी शासन आणि मंदिरे उघडावीत जेणेकरून दोन वर्षापासून खंडित झालेले उत्पन्न पुन्हा सुरू होईल आणि विकासाला हातभार लागेल अशी मागणी सोनाजी खरात यांनी केली आहे.
https://play.google.com/store/apps/details?id=com.edtv.jalnana.com
www. edtvjalna.com
दिलीप पोहनेरकर,9422219172