जालना जिल्हा

लवकरच गाईंच्या सानिध्यात घालविता येणारे वेळ

जालना- गोसेवा हे उद्दात्त हेतुने हाती घेतलेले कार्य असून, या माध्यमातुन कुठलाही उपक्रम हाती घेतल्यास तो निश्चितच पुर्णत्वास जातो, असा ठाम विश्वास कालिका स्टिल्स्‌चे संचालक घनशाम गोयल यांनी आज व्यक्त केला.

देवमुर्ती येथील ‘वृंदावन गोसेवा धाम’ची वाटचाल आदर्श गोशाळेकडे होत असून, जालना जनसेवा ग्रुपच्या माध्यमातुन गोसेवेला आधुनिकतेची जोड देण्याच्या प्रयत्न सुरू आहे . या उपक्रमा अंतर्गत आहे त्याच व शाळेच्या बाजूला उभारल्या जाणार्‍या सभा मंडपासह गो-सानिध्यम्‌ हॉलचे भुमिपूजन आज श्री. गोयल यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कालिका स्टिल्सचे संचालक अरुण अग्रवाल आणि अनिल गोयल, मेटारोलचे संचालक डी. बी. सोनी आणि आशिष भाला, आयकॉन स्टिलचे संचालक जगदीश राठी आणि संजय राठी, प. पू. खडेश्वरी बाबा, आसाम टी कंपनीचे संचालक रमेशभाई पटेल, माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, माजी आमदार अरविंदराव चव्हाण, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर सौ. शकुंतलाताई कदम, प्रा. नरहर कदम, आडतीया असोसिएशनचे अध्यक्ष ओमप्रकाश मंत्री, जेपीसी बँकेचे चेअरमन दीपक भुरेवाल, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विनीत सहानी, व्यापारी महासंघाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष हस्तीमल बंब, किराणा असोसिएशनचे अध्यक्ष सतीष पंच, माहेश्वरी समाजाचे प्रदेश उपाध्यक्ष संजयकुमार दाड, जिल्हाध्यक्ष सत्यनारायण सारडा, जिल्हा सचिव लक्ष्मीनारायण मानधना, शहराध्यक्ष किशनलाल भक्कड, सचिव विजय  राठी, राजेंद्र आबड, राजकुमार दायमा, बंकटलाल खंडेलवाल, सीए गोविंदप्रसाद मुंदडा, विनयकुमार कोठारी, चैनराज सकलेचा, राजेश खिस्ते, गोसेवा धामचे संस्थापक दिलीप राठी, यांच्यासह जालना जनसेवा ग्रुपचे अध्यक्ष सीए डॉ. नितीन तोतला, उपाध्यक्ष सुनिल लाहोटी, सचिव पुरुषोत्तम मोतीवाला, कोषाध्यक्ष गोवर्धन अग्रवाल आदींची उपस्थिती होती.


वृंदावन गोसेवा धामची सुरुवात साधारणत: 9 वर्षांपुर्वी 25 गायींपासून झाली. आज की संख्या 275 वर पोहोचली आहे . काही दिवसांपुर्वी जालना जनसेवा ग्रुपच्या प्रेरणेने या गोसेवा धामला वॉटर कुलर भेट देण्याच्या निमित्ताने श्री. गोयल यांनी भेट दिली होती. त्याचवेळी त्यांनी वृंदावन गोसेवा धाम ही आदर्श गोशाळा बनेल असा विश्वास व्यक्त केला होता. त्यानुसार आज खर्‍या अर्थाने आधुनिकतेची मुहूर्तमेढ गोसेवा धाम येथे रोवली गेली आहे.आगामी दोन-तिन महिन्यात येथे “गोसानिध्यम्‌ हॉल,” गायींसाठी प्रशस्त नविन गो-छत्र आणि सर्व सोयीयुक्त गोसेवा निवासांचे काम होणार आहे. झाली असून, ही सुरुव ते पुढे म्हणाले मनुष्य हा निमित्तमात्र असून, त्याच्या हातुन चांगले कार्य घडणे ही गोमेताची ईच्छा असते. दिलीप राठी यांच्या माध्यमातुन गोसेवच्या कार्याला गती मिळत असून, गोशाळेच्या कामाला आपल्याकडून आवश्यक ते पुर्ण सहकार्य केले जाईल, असे श्री. गोयल यांनी सांगितले.
दरम्यान, वृंदानव गो-सेवा धाम येथे स्व. कपुरचंद पाटणी आणि स्व. झुंबरलाल पाटणी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गौ-सानिध्यम्‌ हॉलची उभारणी केली जाणार असून, त्यासाठी आवश्यक असलेली मदत करण्याची तयारी असल्याची माहिती कचरुलाल पाटणी, योगेश पाटणी आणि दिपेशकुमार पाटणी दिली.

सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले
अंबड येथील निलेश मदनलाल लोहीया हे सामाजिक कार्यात अग्रेसर असून, वेळोवेळी समाजाचे देणे लागतो या भावनेतुन त्यांचा प्रत्येक कार्यात सहभाग असतो. गोसेवेच्या या कार्याला हातभार लावण्यासाठी त्यांनी गायींच्या चार्‍यासाठी 51 हजाराची मदत दिली.

वृंदावन गोसेवा धामच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत  वाटचालीचे आपण साक्षीदार आहोत. या गोसेवा धामसाठी दिलीप राठी यांचे मोलाचे योगदान असून, गोशाळेच्या यशस्वी वाटाचालीत राठी परिवाराचा खर्‍या अर्थाने सिंहाचा वाटा आहे, असे माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी म्हटले.
मंडप पुजन कार्यक्रमाला भेटीप्रसंगी श्री. खोतकर पुढे म्हणाले की, वृंदावन गोसेवा धाममध्ये आजघडीला 275 गायींचे संगोपन होणे ही बाब निश्चितच सर्वसाधारण नसून, या गोसेवा धामला आपणाकडून आवश्यक ते सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही देखील श्री खोतकर यांनी दिली.

https://play.google.com/store/apps/details?id=com.edtv.jalnana.com
www. edtvjalna.com
दिलीप पोहनेरकर,9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button