Advertisment
जालना जिल्हा

अनादी काळाची दांडी कावड यात्रेची परंपरा आजही सुरू

जालना- अनादी काळापासून सुरु असलेली” दांडी कावड” ही परंपरा आजही पहावयास मिळते. अंबड तालुक्यातील लालवाडी येथील भोले भक्तांनी गेल्या 21 वर्षांपासून ही परंपरा सुरू केली आहे.  आज ही ती अखंडपणे सुरू आहे .

देवता आणि राक्षस या दोघांमध्ये जेव्हा समुद्रमंथन झालं आणि या आणि या मंथना मधून अमृत आणि विष असे दोन पदार्थ बाहेर पडले .अमृत तर देवाने पिलं मग विष कोणी प्यायचं? हा प्रश्न पडला शेवटी शिवशंकर अर्थात भोले बाबांनी हे विष पिलं ,परंतु विष पोटात न जाऊदेता त्यांनी ते कंठामध्ये साठवून ठेवलं आणि ते साठवून ठेवल्यामुळे आजही शिवशंकराचा कंठ निळा दिसतो ,म्हणून त्यांना नीलकंठ देखील म्हणतात .या विषामुळे  कंठा ची दाहकता वाढली आणि ती शमविण्यासाठी सर्व देवांनी गंगेचे पाणी आणले आणि ही दाहकता कमी करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे आजही श्रावणाच्या महिन्यामध्ये शिवशंकराला अर्थात भोले बाबांना गंगेच्या पाण्याने अभिषेक करण्याची परंपरा सुरू आहे.

अंबड तालुक्यातील लालवाडी येथील सुमारे पंचवीस तरुणांनी शुक्रवारी पहाटे शहागड येथून वाहणाऱ्या गोदावरी गंगेकडे प्रस्थान केले.  पस्तीस किलोमीटरचा हा प्रवास आहे आणि तेथील गोदावरीचे गंगोदक जल कुंभामध्ये भरून जालना शहराच्या बाजुलाच असलेल्या बर्डीकडे निघाले. दरम्यान काल शनिवारचा मुक्काम रस्त्यात केला आणि आज जालना शहराला लागूनच असलेल्या ईदेवाडी येथे आहे. उद्या ही कावड भोलेश्वर संस्थान बर्डी येथे जाईल आणि गंगोदकाने भोले बाबांना अभिषेक केल्यानंतर तिचा समारोप होईल.

https://play.google.com/store/apps/details?id=com.edtv.jalnana.com
www. edtvjalna.com
दिलीप पोहनेरकर,9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button