गंगाजळी संपली; मंदिरे उघडली नाही तर……shradhasthan
जालना-ज्या मंदिरांना शाश्वत उत्पन्न नाही अशा मंदिरांचे तर हाल होतच आहेत परंतु शाश्वत उत्पन्न असलेल्या मंदिरांच्या देखील आता अडचणींमध्ये वाढ होत आहे. जर मंदिरे उघडले नाहीत तर आर्थिक संकटासोबच उपासमारीची देखील वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच अडचणीत सापडलेलं अंबड येथील जागृत देवस्थान म्हणजे मत्स्योदरी देवी संस्थान .
मंदीराच्या 1 कोटी 40 लाख रुपयांपैकी एक कोटी तीस लाख रुपयांची गंगाजळी संपली आहे. येणाऱ्या नवरात्रात मंदिर जर उघडले नाही तर सुमारे 27 लाखांचा फटका बसून आर्थिक संकट देखील होण्याची शक्यता मंदिराचे व्यवस्थापक कैलास शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
मराठवाड्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील एक जागृत देवस्थान म्हणून या मत्स्योदरी देवी कडे पाहिले जाते .महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, अशा तिन्ही देवींचा वास येथे आहे. त्यामुळे ही तीन पीठ आणि अंबड शहरात एक तुळजाभवानीचं मंदिर ते अर्धपीठ असे एकूण साडेतीन पीठांपैकी हे मंदिर आहे. तहसीलदार हे पदसिद्ध अध्यक्ष तर नायब तहसीलदार हे पदसिद्ध सचिव म्हणून पदाधिकारी आहेत. उर्वरित चार सदस्य आणि एक व्यवस्थापक अशी ही कमिटी व्यवस्थापन पाहते.
गेल्या अठरा महिन्यांच्या कालावधीमधील माहिती देताना व्यवस्थापक कैलास शिंदे यांनी सांगितले की, 2019 पर्यंत मंदिरा कडे एक कोटी 40 लाखांची गंगाजळी होती त्या मधून एक बहुउद्देशीय हॉल बांधकाम करण्यात आले, जिथे मंगल कार्यालयाची व्यवस्था करण्यात आली आहे .त्यासाठी एक कोटी तीस लाख रुपये खर्च झाले आहेत. आणि आता दहा लाख रुपये उरले आहेत. नवरात्राच्या काळात दर वर्षी सुमारे 27 लाख रुपये उत्पन्न होते. त्यामध्ये देणगी लहान मुलांना ओटी मध्ये टाकणे विशेष दर्शन आणि मंदिर परिसरात लावण्यात येणाऱ्या 370 दुकानांचा किराया याचा समावेश होतो. मात्र गेल्या वर्षी नवरात्र न झाल्यामुळे हे 27 लाख रुपये बुडाले आहेत आणि यावर्षी देखील मंदिर जर उघडले नाही तर पुन्हा हे 27 लाख रुपये बुडण्याची शक्यता आहे. संस्थांनमध्ये सुमारे 25 कर्मचारी आहेत आणि त्या 25 कर्मचाऱ्यांवर कुटुंब अवलंबून आहे .याच सोबत मंदिर परिसरात आठ गाळेधारक आहेत आणि त्यांचा देखील व्यवसाय डबघाईला आलेला आहे. असे असताना देखील 2019 मध्ये सातारा ,सांगली, कोल्हापूर ,या भागात महापूर आला होता त्या आपत्तीग्रस्तांना मदत करण्यासाठी संस्थांनने मुख्यमंत्री निधीला 1 लाख रुपयांची मदतही केली होती .मंदिराचे महत्वाचे उत्पन्न म्हणजे नवरात्र आणि श्रावण महिना. श्रावण महिन्यात दररोज इथे अभिषेक केला जातो. आणि त्या माध्यमातून दानपेटी आणि पावती च्या द्वारे उत्पन्न वाढते. यासोबत आणखी एक उत्पन्नाचे साधन म्हणजे इथे बाळगोपाळांसाठी छोटेसे पशु संग्रहालय आणि बगीचा आहे. पाच रुपये तिकिटाच्या आधारे या उत्पन्नाचा देखील मोठा आधार संस्थानला होतो. मात्र ते देखील आता बंद आहे. जिल्हा नियोजन समितीने ज्येष्ठ नागरिकांना मंदिरात जाता यावे या उद्देशाने लिफ्टची व्यवस्था केलेली आहे आणि एका भाविका कडून तीस रुपये घेतले जातात मात्र भाविकच नसल्यामुळे लिफ्ट बंद आहे. त्यामुळे उत्पन्नही बंद आहे .अशा सर्वच बाजूंनी या मंदिराची कोंडी झाली आहे .त्यामुळे मंदिर जर लवकर नाही उघडले तर आर्थिक कोंडीला सामोरे जावे लागणार आहे अशी भीतीही कैलास शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
मंदिर परिसर हा भव्य दिव्य असल्यामुळे इथे देखभाल-दुरुस्तीचाही खर्च मोठा आहे .आठ गाळेधारक ग्राहकच नसल्यामुळे हतबल झाले आहेत. परिसरात बसणाऱ्या आराधीनी देखील परडी मध्ये कधी दान पडेल याची वाट पाहत आहेत. पुजाऱ्याला पूजेच्या थाळीमध्ये दानच येत नसल्यामुळे इतरत्र देखील काम करण्याची वेळ आली आहे.
https://play.google.com/store/apps/details?id=com.edtv.jalnana.com
www. edtvjalna.com
दिलीप पोहनेरकर,9422219172