जालना जिल्हा

उद्धवा अजब तुझे सरकार बंद मंदिरे उघडे बार- भाजप

जालना -गेल्या 18 महिन्यांपासून मंदिराचे प्रवेशद्वार बंद आहेत .मध्यंतरीच्या काळात एक -दोन महिन्यात हे द्वार उघडले गेले मात्र पुन्हा covid-19 च्या नावाखाली आजही हे प्रवेशद्वार बंद आहेत. त्यामुळे मंदिरावर अवलंबून असलेल्या अनेकांची उपासमार होत आहे. म्हणून भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज बंद मंदिरांसमोर घंटानाद करून हे मंदिरे उघडण्यासाठी आघाडी सरकारकडे मागणी केली, ” उद्धवा अजब तुझे सरकार, बंद मंदिरे उघडे बार” अशा प्रकारच्या घोषणा देऊन सरकारच्या या धोरणावर टीकाही करण्यात आली.

जालना शहरातील संभाजीनगर भागात असलेल्या बालाजी मंदिरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज हे आंदोलन करण्यात आले.यावेळी शहराध्यक्ष राजेश राऊत, सिद्धिविनायक मुळे, रामेश्वर भांदर्गे, सुनील खरे, धनराज काबलिये, सुखदेव महाराज गोरे, शिवराज जाधव, बाबासाहेब कोलते, कपिल दहेकर, आदि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

https://play.google.com/store/apps/details?id=com.edtv.jalnana.com
www. edtvjalna.com
दिलीप पोहनेरकर,9422219172

Related Articles