लक्ष्मीनिवास मधेच लक्ष्मीची चणचण,बालाजी मंदिराची व्यथाshradhasthan
जालना- हिंदू धर्मामध्ये पैशाला लक्ष्मी समजतात आणि म्हणूनच दिवाळीला एका विशेष दिवशी या पैशाची म्हणजे लक्ष्मीची पूजा करतात. विष्णूची पत्नी म्हणूनही लक्ष्मीला मान आहे. त्याच सोबत बालाजी म्हणजेच वेंकटेश्वरा,विष्णूच्या च्या दोन्ही बाजूला दोन देवी आहेत .त्यापैकी एक पद्मावती आणि दुसरी लक्ष्मी. असे असतानाही जालन्यातील संभाजी नगर भागात असलेल्या या बालाजी मंदिराला लक्ष्मीची चणचण भासत आहे,
आणि याला कारण म्हणजे गेल्या 18 महिन्यांपासून बंद असलेलं मंदिर. जगप्रसिद्ध असलेले तिरुपती येथील श्री बालाजी अर्थात व्यंकटेश्वराच्या मंदिराची हुबेहूब प्रतिकृती जालना येथील संभाजीनगर भागांमध्ये आहे. तिरुपतीच्या मंदिराप्रमाणेच मंदिराचे प्रवेश द्वार ,गाभाऱ्यातील स्तंभ, बालाजीची मूर्ती ,एवढेच नव्हे तर येथे देण्यात येणारा प्रसाद देखील तिरुपती बालाजी प्रमाणेच शुद्ध तुपात तयार करण्यात येतो.
त्याच प्रमाणे या बालाजी महाराजांची पूजा करण्यासाठी आवश्यक असणारे ब्राह्मण देखील तिरुपती बालाजी येथूनच आमंत्रित केलेले आहेत .त्यामुळे एकूणच या मंदिराचा खर्च अवाढव्य आहे .त्यामुळे सर्व काही भाविकांच्या देणगी वरच अवलंबून आहे .
गेल्या 18 महिन्यांपासून मंदिर बंद असल्यामुळे भाविकच आले नाहीत, पर्यायाने दानपेटी रिकामीच आहे. मंदिराच्या विश्वस्तांनी इथे सभाग्रह बांधण्याचा निर्णय घेतला होता मात्र ,आहे तोच खर्च आता भागवणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे नवीन विकास कामांचा तर विषयच नाही. मंदिराची देखभाल दुरुस्ती आणि कर्मचाऱ्यांचे मानधन आता रखडण्याची शक्यता आहे .त्यामुळे शासनाने त्वरित मंदिरे उघडावीत अशी मागणी मंदिराचे विश्वस्त श्याम लोया यांनी केली आहे.
या मंदिरामध्ये भव्य-दिव्य बालाजीची मूर्ती आहे. या मूर्तीच्या बाजूला आणखी तीन मूर्ती आहेत ज्यामध्ये मध्यभागी बालाजी महाराज एका बाजूला लक्ष्मी आणि दुसऱ्या बाजूला पद्मावती आणि समोर सुदर्शन चक्र आहे. गाभाऱ्यामध्ये गणपती बाप्पा, नागराज देवता ,आणि गरुड देवता देखील स्थापित आहेत .एका बाजूला बगीच्या आणि दुसऱ्या बाजूला सभागृहासाठी मोकळी जागा आहे याच जागेमध्ये सभागृहाचे बांधकाम होणार होते मात्र कोणाच्या महामारी मुळे ते रखडले आहे.
सविस्तर बातमी पहा
www. edtv jalna.com
वर किंवा प्ले स्टोर वरून डाउनलोड करा edtv jalna हे app.
-दिलीप पोहनेरकर.