Advertisment
जालना जिल्हा

नंदीबैलवाल्यांनी लावला वैज्ञानिकाला 87 हजाराला चुना

 

जालना- अंधश्रद्धा आणि जादूटोण्याला सामान्य माणूस बळी पडला तर त्याचे नवल नाही, मात्र एखाद्या वैज्ञानिकाला जर नंदीबैलवाल्याने 87 हजाराला चुना लावला असेल तर !या नंदीबैल वाल्याच्या हिमतीची दाद द्यावी, का वैज्ञानिकाची कीव करावी? असा संभ्रम निर्माण होतो.अशीच घटना दिनांक 26 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता जालना शहरातील उच्चभ्रू वस्ती असलेल्या सुखशांती नगर येथे घडली.

सदर बाजार पोलिस ठाण्यात तेजवान सैनी यांनी ही तक्रार नोंदविली आहे. मूळचे राजस्थान येथील भरतपूर जिल्ह्यात राहणारे तेजवान सैनी हे सध्या जालना येथे एका बियाणे कंपनी मध्ये वैज्ञानिक म्हणून काम करतात. गुरुवारी 26 ऑगस्ट रोजी त्यांच्या घरासमोर एक नंदीबैलवाला आला आणि नंदीबैला साठी दानधर्माचे आवाहन करू लागला. यावेळी सैनी यांनी वरच्या मजल्यावर या नंदीबैलाला काय पाहिजे? असे विचारले असता नंदीबैल वाल्याने नंदी साठी गुळ आणि धान्य पाहिजे असे सांगितले ,आणि त्याला प्रतिसाद देत सैनी यांनी एका बकीट आला दोरी बांधून ते खाली सोडले . यावर नंदीबैल वाल्याचे पोट भरले नाही .त्याने ते धान्य तुम्ही स्वतः खाली येऊन नंदीबैलाला खाऊ घाल असे सांगितले. यावेळी सैनी यांची पत्नी तृप्ती देखील सोबत होती हे धान्य खाऊ घालत असतानाच त्याने भविष्य सांगण्यास सुरुवात केली. तुमची नोकरी गेले आहे, थोड्याच दिवसात तुमची पत्नी देखील आजारी पडेल असे सांगितले आणि पिण्यासाठी पाणीही मागितले. त्यानंतर नंदीबैलवाला त्यांच्या घरात गेला आणि तुमच्या घरावर काळी जादू आहे ती नष्ट करायची असेल तर 135 किलो मिठाई गरिबांना वाटप करावी लागेल आणि त्यासाठी 87 हजार रुपये खर्च येईल असेही  सांगितले .त्याच्या या बतावणी ला सैनी परिवार बळी पडला आणि मिठाई वाटप करण्याची तयारी दर्शविली .त्याच वेळी पूजा करण्यासाठी घरांमधून हळदीकुंकू अगरबत्ती आणण्यास सांगितली. तसेच येताना  87 हजार रुपये देखील घेऊन येण्यास सांगितले मात्र सैनी यांच्या घरात फक्त 37 हजार रुपये होते त्यामुळे त्यांनी ते 37 हजार रुपये आणून नंदीबैलवाला जवळ दिले. त्याने तृप्ती यांच्या डोक्यावर ही रक्कम ओवाळून ठेवून घेतली आणि काहीतरी पूजा करत बसला. त्यानंतर उर्वरित 50 हजार रुपयांची मागणी केली मात्र घरात रोख रक्कम नसल्यामुळे सैनी यांची पत्नी तृप्ती यांनी त्यांच्या बँक खात्यातून नंदीबैल वाल्याच्या बँक खात्यामध्ये ऑनलाइन हे पन्नास हजार रुपये वर्ग केले. त्यानंतर नंदीबैल वाल्याने एक कांदा पकडून कपड्यामध्ये गुंडाळून घेतला आणि आता मी हा कांदा नंदीबैलाला खाऊ घालेल आणि तुमच्या घरावर ची काळी जादू नष्ट होईल असे सांगून तो निघून गेला, आणि जाताना काही कागदाच्या पुड्या सैनी परिवाराच्या हातात दिल्या आणि मी गेल्यानंतर या जाळून टाका असे सांगितले.  एक नंदीबैलवाला वर बसलेला असताना अन्य दोघे जण खाली उभे होते. दरम्यान नंदीबैलवाले निघून गेल्यानंतर 27 तारखेला आपली फसवणूक झाल्याची बाब सैनी यांच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांनी सदर बाजार पोलीस ठाणे गाठून फसवणूक झाल्याची तक्रार नोंदविली आहे.

गणेश नागराज गंगावणे राहणार शनिशिंगणापूर, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर, आणि अन्य दोन अशा एकूण तीन भोंदूबाबा विरुद्ध सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे .पोलिसांनी भादवि कलम 420 तसेच जादूटोणा आणि अघोरी कृत्य, अमानवीय कृत्य करण्याचा कायदा 2013 अन्वये गुन्हा नोंद केला आहे मात्र अद्याप पर्यंत हे नंदीबैलवाले पोलिसांना सापडलेले नाहीत.

-दिलीप पोहनेरकर,9422219172

 

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button