Advertisment
जालना जिल्हा

गावठी पिस्टल प्रकरणी धारदार शस्त्रांसह एक अल्पवयीन मुलगा ताब्यात

जालना- सदर बाजार पोलिसांनी 25 तारखेला पकडलेल्या गावठी पिस्टल प्रकरणी आज आणखी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून धारदार शस्त्र ही जप्त केले आहेत. दरम्यान या पिस्टल प्रकरणी एकूण चार आरोपी होते. त्यापैकी एका आरोपीला पहिल्याच दिवशी म्हणजे पंचवीस तारखेला अटक केली होती तर तीन फरार होते .या तीन पैकी आज एका अल्पवयीन मुलाला स्कुटी चालवत असताना ताब्यात घेतले आहे. बीई 39 38 असा स्कुटी चा नंबर असून त्याच्याकडून धारदार खंजर व एक गुप्ती आणि स्कुटी असा सुमारे 35 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस उप निरीक्षक रमेश रुपेकर यांना गुप्त माहिती मिळाली होती .त्या माहितीनुसार एकजण गावठी पिस्टल विक्री करण्यासाठी भोकरदन नाका परिसरात येणार असल्याचे कळाले .ही माहिती सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांना देऊन त्यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक रमेश रुपेकर यांनी सापळा लावला आणि दिनांक 25 रोजी शुभम दिगंबर काळे, राहणार कीर्तापूर तालुका मंठा याला, गावठी पिस्टल सह ताब्यात घेतले होते .चौकशीदरम्यान त्याने अन्य तीन साथीदार असल्याचे सांगितले होते. या तिन्ही साथीदारांचा शोध पोलीस उपनिरीक्षक रमेश सुपेकर ते घेत होते. हा  शोध घेत असताना आज दिनांक 31 रोजी संभाजी नगर मधील काळे गल्लीत एक अल्पवयीन मुलगा स्कुटी क्रमांक एम एच 21 बी ई 3938  वर बसलेला असल्याचे कळाले .त्याच वेळी पोलिसांनी सापळा लावून या मुलाला ताब्यात घेतले आणि त्याच्या कडून धारदार खंजर व एक गुप्ती हा ऐवज जप्त केला आहे. दरम्यान ही कारवाई पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रमेश सुपेकर, पोलीस अंमलदार कैलास खाडे, अमोल हिवाळे, समाधान तेलंग्रे, महादू पवार, सोपान क्षीरसागर, राजू वाघमारे, योगेश पठाडे, महिला पोलीस अमलदार सुमित्र अंभोरे यांनी केली.

-दिलीप पोहनेरकर,edtv jalna

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button