Advertisment
जालना जिल्हा

निधीअभावी रखडला दुर्गामातेचा जीर्णोद्धार; मंदिर बनले धोकादायकshradhasthan

जालना- शहरातील फक्त दुर्गामातेचे भाविकच नव्हे तर सर्व समाज आणि सर्व व्यवसायिक वाट पाहतात ते दुर्गादेवीच्या यात्रेची. पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या परिसरात भव्य पटांगणात हे दुर्गा मातेचे मंदिर आहे.

ठराविक जागा सोडली तर बाकी सर्व जागा ही पोलीस प्रशिक्षण केंद्राची अर्थात शासनाची आहे. त्यामुळे अतिक्रमणापासून हे मंदिर बचावल आहे .परंतु भव्य परिसर असल्यामुळे इथे दरवर्षी नवरात्रात मोठ्या प्रमाणात यात्रा भरते, आणि या यात्रेमध्ये होणाऱ्या उलाढालीवर अनेकांचे वर्षभराचे गणित अवलंबून असते आणि वर्षभराचे उत्पन्न या दहा दिवसाच्या यात्रेमुळे होते.

याच सोबत या परिसरामध्ये ख्रिश्चन समाजाच्या देखील मोठ्या संस्था आहेत. या संस्थेच्या जागादेखील यात्रे मध्ये येणाऱ्या व्यवसायिकांना भाडेतत्त्वावर दिल्या जातात. आणि या संस्थांना उत्पन्न होते.

दोन वर्षांपासून यात्रा झाल्या नाहीत त्यामुळे आता मंदिराचे पुजारी तर हतबल झालेच आहेत.त्याच सोबत मंदिरावर व्यवसाय करणारे इतर व्यवसायिक देखील आता हतबल झाले आहेत आणिआता काय करेल ती देवीच करेल ?असे म्हणून हाताश होत आहेत. पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या ताब्यात ही जागा असल्यामुळे या मंदिराचा विकासही करता येत नाही, आणि मंदिर वाऱ्यावरही सोडता येत नाही. अशा द्विधा परिस्थितीमध्ये मंदिर व्यवस्थापन सापडल आहे. सुमारे सव्वाशे वर्षापूर्वी स्थापित झालेले हे मंदिर 1962 मध्ये लहान जागेत होतआणि चुना मातीमध्ये बांधलेल आहे. कालांतराने याचा परीघ वाढला आणि पत्र आली. आज या मंदिराच्या भिंती पावसामुळे धोकादायक झाल्या आहेत. परंतु निधीअभावी त्याची दुरुस्ती करणे देखील शक्य नसल्याची माहिती मंदिराचे पुजारी अंबाशंकर श्रीमाळी यांनी दिली. बाहेरून साध दिसणाऱ्या या मंदिर परिसरात असलेल्या जुन्या आणि मोठ्या वृक्षांमुळे निसर्गरम्य वातावरणात आहे .

मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश करताना समोरच दिसणारा वाघ आणि त्यानंतर पितलाच्या धातूमधील सिंह हे बच्चेकंपनीच आकर्षण ठरतं. मंदिरामध्ये विशेष काही बाब नसली तरी एक जागृत देवस्थान म्हणून भाविक इथे माथा टेकवण्यासाठी येतात. मंदिराच्या गाभाऱ्यात शनिमहाराज देखील स्थापित आहेत, आणि जुन्या भिंतींवर आकर्षक पद्धतीने काढलेली देवी-देवतांचे चित्र पाहण्यासाठी भावीक क्षणभर थबकतात. मंदिरातून बाहेर पडल्याबरोबर समोर दिसतात ते बजरंग बली पूर्ण मंदिराचा फेरफटका दहा ते पंधरा मिनिटात पूर्ण होतो मात्र परिसरात दिसणाऱ्या हिरव्यागार झाडांमुळे भाविक पुन्हा एकदा निसर्गाच्या सानिध्यात रममान होतो. मंदिराला दानपेटी शिवाय अन्य कोणतेही उत्पन्न नाही. मुख्य रस्त्यापासून आत मध्ये असलेले हे मंदिर आहे. त्यामुळे सहजासहजी भाविक मध्ये जात नाहीत, आणि गेल्या 18 महिन्यांपासून मंदिर बंद असल्यामुळे रोज दर्शनाला जाणारे भाविकही कमी झाले आहेत. खरं तर मंदिराचा भव्य परिसर लक्षात घेता ईथे कोरोनाचे सामाजिक अंतर आणि कोरोना चे सर्व नियम पाळल्या जाऊ शकतात. मात्र शासनाच्या आदेशा पुढे कोणाचेच चालत नाही .त्या अनुषंगाने हे मंदिर देखील बंदच आहे. गेल्या महिनाभरापासून तुरळक भाविक मंदिरात यायला लागले आहेत मात्र त्यांच्यावर मंदिराचा खर्च चालवणे अवघड झाले आहे. मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी भाविकांनी, दानशूरांनी आणि शासनाने देखील मदत करावी अशी अपेक्षा मंदिराचे पुजारी अंबाशंकर श्रीमाळी यांनी व्यक्त केली आहे.

-दिलीप पोहनेरकर,9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button