जालना जिल्हा

जिल्हा परिषदेचे शाखा अभियंते घोरपडे लाचेच्या जाळ्यात

जालना-जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या जालना येथील उपविभागाचे शाखा अभियंता तथा प्रभारी उपअभियंता डी. पी.घोरपडे यांना लाच प्रकरणी जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जालना उपविभागातून ताब्यात घेतले आहे.

तक्रारदार हे हिवरडी गावचे सरपंच असून ग्राम पंचायत अंतर्गत वैक्तिक नळ कनेक्शन जोडणी व नवीन पाईप लाईन व जुनी पाईप लाईन दुरुस्तीची मोजमाप पुस्तिका.तयार करून एकूण 7 लाख 40 हजार रुपयांचे बिल मंजूर करण्यासाठी आरोपी घोरपडे यांनी यापूर्वी 10,000 रु घेतले होते व आज रोजी पंचा समक्ष पुन्हा 75 हजार रुपयांची मागणी करून पहिला 10 हजार रुपयांचा हफ्ता  स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.लाच लुचपत विभागाचे पथक घोरपडे यांना सोबत घेऊन औरंगाबाद येथील निवास्थानाची झडती घेण्यासाठी रवाना झाल्याची शक्यता आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक एस. एस. शेख. यांनी केली. यास आपल्या मध्ये  पोलीस कर्मचारी मनोहर खंडागळे, गणेश शेळके, ज्ञानेश्वर मस्के, जावेद शेख, प्रवीण खंदारे ,यांचा समावेश होता.

*दिलीप पोहनेरकर,9422219172*

Related Articles