सत्ताधाऱ्यांसह विरोधकही ओबीसी आरक्षणाच्या विरोधात-रेखा ठाकूर
जालना- ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी सत्ताधारी आणि विरोधक या दोघांचाही विरोध आहे. असा आरोप वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा श्रीमती रेखा ठाकूर यांनी आज गुरुवारी जालन्यात केला. वंचित बहुजन आघाडीची निवडणुकीची पूर्वतयारी सुरू झाली आहे. त्या अनुषंगाने राठवाड्याच्या दौर्यावर निघालेल्या रेखा ठाकूर यांनी आज जालन्यात या आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यापूर्वी त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
दरम्यान निवडणुकीच्या संदर्भात पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, या पुढील सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार आहे. कोणत्याही पक्षाने युतीसाठी बोलावले तरीही युती केली जाणार नाही. कारण युतीमुळे आपल्या पक्षाचा विस्तार थांबतो ,ही बाब आता लक्षात आली आहे. पहिल्यावेळी एम.आय.एम. सोबत युती केली होती. त्यावेळी नवीन होतो, आता युती नसल्यामुळे एम. आय. एम. चे तरुण मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडी मध्ये येत असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान भविष्यातील निवडणुकीसंदर्भात आत्तापर्यंत गेल्या 70 सत्तर वर्षात ज्या राजकीय पक्षांनी सत्ता उपभोगली त्या सर्व पक्षांशी आमची लढत असणार आहे. विशेष करून काँग्रेस सोबत. ओबीसीला आरक्षण मिळावे ही आमची ही भूमिका आहे परंतु ओबीसीच्या आरक्षणासाठी निवडणुका पुढे ढकलणे योग्य नाही .ती मोठी प्रक्रिया आहे आणि ती चालत राहील, या ओबीसीच्या आरक्षणाच्याआडून राज्य सरकार निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न करीत आहे. असा आरोपही त्यांनी केला.
जालना शहर हे आर्थिकदृष्ट्या सक्षम शहर आहे मात्र जालना शहराचे महानगरपालिकेत रूपांतर करण्यासाठी नेतेमंडळी उदासीन आहे, कारण महानगरपालिका झाल्यानंतर विविध करांमध्ये वाढ होते आणि ही वाढ झाली तर नेते मंडळी चे मतदार दुखावले जातील याची भीती या मंडळींना वाटत असल्याचे त्या म्हणाल्या.
वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा श्रीमती ठाकूर यांनी पूर्ण पत्रकार परिषदेमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचे किंवा राजकीय पुढाऱ्यांचे नाव घेणे टाळले, परंतु जालना शहर विशेष करून नगरपालिका हेच त्यांचे टार्गेट असल्याचे वारंवार जाणवत होते .कारण जालना नगरपालिकेतील उत्पन्न, जालना नगरपालिकेच्या शाळा, शहरातील रस्ते या विषयावर त्यांनी भाष्य केले.
पत्रकार परिषदेला एवढी मंडळी होती उपस्थित.
उपाध्यक्ष गोविंद दळवी ,महासचिव अरुंधती सिरसाठ, महाराष्ट्र उपाध्यक्षा सवि मुंढे ,मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे , मराठवाडा उपाध्यक्ष अँड अशोक खरात, दीपक डोके, जिल्हा अध्यक्ष डेव्हिड घुमारे, जिल्हा अध्यक्ष भालचंद्र भोजने, अकबर इनामदार, अँड कैलास रत्नपारखी,सतिष खरात, विष्णू खरात, दिपक घोरपडे, शेख लालाभाई, कैलास रत्नपारखे,प्रा संतोष आढाव, प्रशांत कसबे, चंद्रकांत कारके, शफिक आत्तार,सिद्धार्थ पैठणे.
https://play.google.com/store/apps/details?id=com.edtv.jalna,
-दिलीप पोहनेरकर,9422219172