विधिलिखित गंडांतर टाळण्याला कोरोनाचा अडसरshradhasthan

जालना- विधिलिखित गंडांतर मागे लागल्यानंतर अनेकांचे आयुष्य देखील उद्ध्वस्त होते आणि धार्मिक विधी केल्यानंतर हे गंडांतर टाळता येतं असा एक समज आहे. मात्र कोरोनाचे गंडांतर इतर सर्व गंडांतरापुढे वरचढ ठरले आहे. हे गंडांतर मागे लागलेल्या यजमानाला तर सोडाच पण हा विधी करणाऱ्या पुरोहिताला देखील या या कोरोनाच्या गंडांतरामुळे उपाशी बसण्याची वेळ आली आहे.
जन्मपत्रिकेचे मधील दोष नष्ट करण्यासाठी कालसर्प योग हा विधी करावा लागतो .हा विधी घरामध्ये करता येत नाही. त्यासाठी ठराविक ठिकाणे ठरलेली आहेत. त्यातीलच एक ठिकाण म्हणजे जालना शहरात जुना जालना भागात असलेलं मुक्तेश्वर महादेव मंदिर संस्थान. या संस्थांच्या परिसरात देवीचे देखील मंदिर आहे .
हा विधी महादेव म्हणजे शंकराच्या समोरच करणे कम क्रमप्राप्त आहे. त्यामुळे या संस्थांनाला महत्त्व प्राप्त झाले आहे. सुमारे साडेचारशे वर्षांपूर्वीच हे मुक्तेश्वर महादेव संस्थान आहे .आणि इथे नियमितपणे कालसर्प योगाचे विधी केल्या जातात .
गेल्या 18 महिन्यांपासून हे विधीच बंद आहेत. त्यामुळे अनेक भाविकांवर कालसर्प योगाचे गंडांतर आले आहे आणि विविध अडचणींसाठी करण्यात येणाऱ्या शांतीचा विधी देखील झालेला नाही .दरम्यान कोरोनाच्या काळामध्ये पुरोहित मंडळींनी अभिषेक ,सत्यनारायणपूजा, अशा घरगुती पूजा व्हिडिओ कॉल , ऑनलाइन च्या माध्यमातून केल्या, मात्र हा विधी त्या प्रकारचा करता येत नाही. आणि मंदिरे देखील बंद आहेत त्यामुळे अनेक यजमान विधी करण्यासाठी इच्छुक असतानाही तो करता आला नाही .पर्यायाने पुरोहितावर उपासमारीची वेळ आली आहे.
बालपणापासूनच कर्मकांड आणि वेद शास्त्रांचे धडे घेतलेल्या पुरोहितांना इतर दुसरा व्यवसाय देखील करता येत नाही, विधी करावा प्रशासनाची अडचण नाही करावा तर यजमानाची तळमळ आणि उदरनिर्वाहाचा विषय अशा द्विधा मनस्थितीत पुरोहित मंडळी अडकली आहे त्यामुळे एकीकडे आड तर दुसरीकडे विहीर अशी त्यांची परिस्थिती झाली आहे.कोरोनाच्या महामारी मुळे आत्तापर्यंत बंद ठेवलेले सर्व विधी पुरोहितांनी आता सुरू केले आहेत ,मात्र यजमानापर्यंत ही बातमी न गेल्यामुळे आजही पुरोहितांना प्रतीक्षा आहे ती कालसर्प योगाचा विधी करणाऱ्यांची
या विधी वर फक्त पुरोहितांची उपजीविका नाही तर विड्याचे पान विक्रेते, श्रीफळ विक्रेते, पुष्पहार विक्रेते आणि पूजेचे अन्य साहित्य विक्री करणाऱ्यांची देखील उपजीविका आहे.
मुक्तेश्वर महादेव संस्थान हे प्राचीन संस्थान असल्यामुळे परिसरात मोठाले वटवृक्ष आहेत. त्यामुळे वातावरण थंड राहून निसर्गाच्या सानिध्यात राहिल्याचा आनंद येथे मिळतो या मंदिरामध्ये रवि काका जहागिरदार,व्यंकटेश देशमुख,एकनाथ माहूरकर,सखाराम हिवरेकर ,संतोष बाणेगावकर ,राम देशमुख ,बलवंत वाघमारे ,श्रीकांत वैद्य, मंगेश हिवरेकर ,अमोल खडके ,सखाराम मोहितेअभिषेकअग्निहोत्री,सुनिल मानेगावकर आधी पुरोहित मंडळी पौरोहित्याा चे काम करतात तर रामराव देशमुख हे मंदिराच्या व्यवस्थापनाचे काम पाहतात.
https://play.google.com/store/apps/details?id=com.edtv.jalna
दिलीप पोहनेरकर,9422219172