बाप्पांची मिरवणूक यावर्षी देखील नाही; गणेश मंडळांच्या नोंदणीला रविवार सुरुवात
जालना-गणेश भक्त ज्या दिवसाची वाट पाहत असतो तो दिवस शुक्रवारी दहा तारखेला येत आहे. गणपती बाप्पांचे आगमन या दिवशी होणार आहे. आणि त्या अनुषंगाने प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. याचाच एक भाग म्हणून आज पोलिस प्रशासनाच्या वतीने शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. शोभा प्रकाश मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांची उपस्थिती होती .तर प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उपविभागीय अधिकारी संदिपान सानप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, आदींची उपस्थिती होती. पोलिस प्रशासनाच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, आणि उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील, यांचीही उपस्थिती होती.
यावर्षी देखील गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. गणेशोत्सवाची स्थापना तर होईल मात्र विसर्जनाच्या दिवशी मिरवणूक काढता येणार नाही. गणेश मंडळापासून थेट विसर्जन ठिकाणी हे वाहन जाईल. दरम्यान दहा तारखेला सुरू होणाऱ्या या गणेशोत्सवाच्या सार्वजनिक मंडळांच्या नोंदणीला रविवार दिनांक पाच पासून शोभा प्रकाश मंगल कार्यालयात सुरुवात होणार आहे. या गणेशोत्सवादरम्यान सार्वजनिक गणेश मंडळांनी आरोग्यविषयक जनजागृती, विशेष करून covid-19 तिच्या जनजागृतीच्या देखाव्यांवर भर द्यावा असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विवेक खतगावकर यांनी केले आहे. शहरातील सर्व पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उपस्थित होते.
https://play.google.com/store/apps/details?id=com.edtv.jalna
*दिलीप पोहनेरकर,9422219172