जालना जिल्हा

संतोषी मातेच्य व्रतांची उद्यापनं लांबलीshradhasthan

जालना -मारुती आणि महादेवाच्या सोबतीला 1958 मध्ये स्थापन झालेले संतोषी माता मंदिर हे ग्रामीण भागातील महिलांचे श्रद्धेचे ठिकाण आहे. शहरी भागातील महिलांपेक्षा ईथे ग्रामीण भागातील महिला भाविक जास्त येतात आणि व्रताचे उद्यापन ही करतात .जोपर्यंत उद्यापन  होत नाही, संतोषी माते ला नैवेद्द केला जात नाही, तोपर्यंत व्रत संपले असे होत नाही. परंतु गेल्या दोन वर्षांमध्ये हे मंदिर बंद असल्यामुळे महिला मंडळांचे व्रत लांबतच गेले आहे.

नवीन जालना परिसरात सुमारे पाचशे वर्षांपूर्वीचे मारुती आणि महादेवाचे एक मंदिर आहे. या मंदिरात 1958  शर्मा यांनी दीड वर्ष पुरश्चरण करून संतोषी मातेची स्थापना केली.

हळूहळू हे मंदिर जिल्ह्यातील एकमेव संतोषी माताचे मंदिर म्हणून नावारूपाला आलं .अन्य वेळी या मंदिरात शुकशुकाट असतो मात्र शुक्रवारच्या दिवशी मंदिर भाविकांच्या गर्दीने फुलून जाते.

विशेष करून महिला मंडळ आपल्या परिवाराला घेऊन इथे येतात आणि व्रताचे उद्यापन करतात. हे उद्यापन करताना प्रथेप्रमाणे मंदिराच्या परिसरातच सर्व स्वयंपाक करून त्याचा नैवेद्य देवीला दाखविला जातो .त्यासाठी दिवसभर येथे भाविक थांबलेले असतात . काही भाविक मनोइच्छित कामना पूर्ण झाल्यानंतर देवीच्या मंदिरात नारळ ही बांधतात ही एक प्रथा येथे आहे. त्यामुळे मंदिराच्या भिंती विविध कपड्यांमध्ये बांधून ठेवलेल्या नारळांनी गच्च भरलेल्या आहेत.

शर्मा परिवाराकडे परंपरागत या मंदिराचे व्यवस्थापन आहे. मात्र ज्यांनी हे संतोषी माता मंदिर स्थापित केलं ते स्वर्गवासी झाल्यामुळे पुढे त्यांचे चिरंजीव डॉ. विजय शर्मा हे गेल्या काही  वर्षांपासून एक दीड लाख रुपये महिन्याची नोकरी सोडून या मंदिराचे व्यवस्थापन पाहत आहेत. मंदिर तसे साधेच आहे मात्र परिसर मोठा असल्यामुळे आणि पिंपळाच्या झाडा मुळे या मंदिराला शोभा आली  आहे. सकाळी दर्शन दुपारी नैवेद्य आरती झाल्यानंतर भाविक विश्रांती करूनच मंदिरातून पाय काढता घेेतात आणि दिवसभर मारुती, महादेव आणि संतोषी माता यांच्या सानिध्यात निवास केल्याचा आनंद या भाविकांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतो. मंदिरावर इतरही काही व्यवसायिकांची उपजीविका आहे तीदेखील आता हळूहळू पूर्ववत होतआहेत.कुठल्याही मंदिराला किंवा संस्थेला कायमस्वरूपी उत्पन्न असायला हवं! जेणेकरून ही संस्था दीर्घ काळ टिकू शकते अन्यथा उत्पन्न आणि खर्चाची सांगड घालताना अनेक संस्था, मंदिरदेखील बंद पडतील अशी भिती देखील या मंदिराचे व्यवस्थापक डॉक्टर विजय शर्मा यांनी व्यक्त केली आहे.

-दिलीप पोहनेरकर,9422219172

Related Articles