जालना जिल्हा

साहेब तुमचं मस्त चाललंय.. एका दादांनी दुसऱ्या दादांची उडवली खिल्ली

जालना- साहेब तुमचं मस्त चाललंय !अंबालिका कारखान्यात हेलिकॉप्टरने उतरता मग तुम्हाला सगळ्या सोयी उपलब्ध होतात, अशी खिल्ली भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची उडवली आहे.

भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी चंद्रकांत दादा आज जालन्यात आले होते.  परतूर चे आमदार तथा माजी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या निवासस्थानी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी विविध विषयांवर त्यांनी प्रश्नांची उत्तरे दिली .त्यामध्ये जावेद अख्तर यांनी संघ बजरंग दलाचा जोडलेला संबंध, महिलांचा सन्मान होत नसल्यामुळे  होणारी नाराजी, संजय राऊत या सर्वच विषयाला त्यांनी उत्तरे दिले. दरम्यान भविष्यामध्ये सर्व निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचेही त्यांनी सूतोवाच केलं. हे बोलत असतानाच ते म्हणाले की पाच वर्ष भारतीय जनता पक्षाचे सरकार उत्तम पणे चालू होते .आताचे सरकार हे विश्वास घातकी आहेत. 56 आमदारांवर मुख्यमंत्री, 54 आमदारांवर उपमुख्यमंत्री, आणि 44 आमदारांवर महसूल मंत्री .आशा विश्वास घातकी पक्षांसोबत आम्हाला काम करायचे नाही. जे आपले आहेत, प्रामाणिक आहेत आणि खरोखरच पक्षावर प्रेम करतात अशा सोबत आम्ही काम करू. त्यामध्ये सदाभाऊ खोत, रामदास आठवले ,महादेव जानकर, विनायक मेटे, विनय कोरे, या सर्वांना सोबत घेऊन निवडणुका लढवू आणि त्याच जिंकुनही दाखवू असा विश्वास देखील चंद्रकांत दादांनी व्यक्त केला. या वेळी आमदार बबनराव लोणीकर, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार संतोष दानवे, भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस राहुल लोणीकर, जिल्हा सरचिटणीस सिद्धिविनायक मुळे, जिल्हाध्यक्ष प्रा. सुजित जोगस आदींची यावेळी उपस्थिती होती.

-दिलीप पोहनेरकर.9422219172

Related Articles