Advertisment
बाल विश्व

जालना-औरंगाबाद महामार्गावर खड्ड्यांमुळे अपघात; तीन जण बचावले

बदनापूर- जालना औरंगाबाद महामार्गावर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी या रस्त्याचे कंत्राटदार नरबळीची वाट पाहत आहेत का असा संतप्त सवाल आज दुपारी झालेल्या अपघाताच्या निमित्ताने प्रवासी विचारत आहेत .रविवारी (दि. 5 सप्टेंबर) दुपारी 3 वाजेच्या सुमारास शेलगाव येथे जालनाकडून औरंगाबादकडे जाणारी अल्टो कार खड्ड्यांना चुकवताना उलटली. नशीब बलवत्तर म्हणून यातील तिन्ही प्रवाश्यांना किरकोळ मार लागला. बाजूने मोठे वाहनजात नसल्याने मोठा अपघात टळला. अशा खड्डेमय रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि प्रशासन लक्ष देत नसल्याने वाहन संताप व्यक्त करीत आहेत. सदरील महामार्ग टोलवेज या कंपनीकडे  दुरुस्ती व देखभालीसाठी असताना व बांधकाम विभागाचे अभियंता लक्ष ठेवत नसल्याने ही कंपनी तात्पुरत्या स्वरूपात येऊन मुरूम माती टाकून या महामार्गाची मलमपट्टी करते. मात्र अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने ही कंपनी निर्ढावली आहे . आणि अशा अपघातांमुळे जनतेमध्ये उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button