भाऊ !तुम्ही सदस्याच्या भूमिकेत या; गणेश बापूंचा जीपच्या माजी अध्यक्षांना सल्ला
जालना- भाऊ तुम्ही आता अध्यक्ष नाहीत तर सदस्य आहात, त्यामुळे सदस्याच्या भूमिकेत या आणि सर्व सभासदांना बोलू द्या! असा सल्ला जिल्हा परिषद सदस्य गणेश बापू फुके यांनी माजी अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांना दिला. जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृह मध्ये आज सर्वसाधारण सभा पार पडली .
दरम्यान सर्वसाधारण सभे समोरील विषयांवर चर्चा होण्यापूर्वीच त्या विषयांना मंजुरी मिळण्यापूर्वीच दुसऱ्याच विषयांवर चर्चा होते आणि कोणत्याही सदस्याने विषय काढला तर माजी अध्यक्ष तथा सदस्य अनिरुद्ध खोतकर हेच बोलतात ,त्यामुळे आज गणेश बापूनी भाऊंना सल्ला दिला , सर्व सभासदांना बोलू द्या ,एवढेच नव्हे तर तुम्ही बोलत असताना आम्ही मध्ये बोलतो का? असा प्रश्नही त्यांनी केला. तुम्ही आता माजी अध्यक्ष आणि सदस्य आहात त्यामुळे सदस्याच्या भूमिकेत या आणि महिलांनाही त्यांच्या भागातील प्रश्न मांडू द्या! असाही सल्ला बापू यांनी दिला या सल्याला महिलांनी समर्थन दिले.
दिलीप पोहनेरकर, edtv jalna,9422219172