पिक विमा कंपन्यांवर 420 चा गुन्हा दाखल करा ;जीपचा सर्वसाधारण सभेत ठराव? ही पहा विमा कंपन्यांची पत्ते
जालना- शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला असतानाही पिक पिकाचे नुकसान होऊनही पिक विमा कंपन्या शेतकऱ्यांना पिक विमा देत नसल्यामुळे आज या कंपन्यांवर मिनी मंत्रालय चांगलेच तापले होते. मिनी मंत्रालय अर्थात जिल्हा परिषदेच्या सर्व साधारण सभेचे आज काय कै. यशवंतराव चव्हाण सभागृह मध्ये आयोजन करण्यात आले होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तमराव वानखेडे, हे होते तर मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षाली रसाळ(सामान्य), उपमुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी राजू सोळुंके, महिला व बालकल्याण सभापती सौ.अयोध्या चव्हाण, यांच्यासह जिल्ह्यातील बहुतांश जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.
दरम्यान शेतकऱ्यांना पिक विमा मिळण्यात येणाऱ्या अडचणी संदर्भात जिल्हा परिषद सदस्य अनिरुद्ध खोतकर ,जय मंगल जाधव, गणेश बापू फुके, डॉक्टर साबळे, शालिग्राम मस्के, आदी सदस्यांनी सभागृहाला धारेवर धरले. आणि विमा कंपनीच्या उपस्थित प्रतिनिधींना विविध प्रश्न विचारून भंडावून सोडलं. दरम्यान या प्रतिनिधींची गोलमाल उत्तरे पाहून सभागृहाने या कंपन्यांनी फसवणूक केल्या प्रकरणी या कंपन्यांवर 420 चा गुन्हा दाखल करावा अशी जोरदार मागणी केली, मात्र कृषी अधिकाऱ्यांच्या मार्फतच हा सर्व ठराव पारित होऊ शकतो, त्यांच्या सोबत चर्चा करावी लागेल अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे यांनी दिली. मात्र सभागृहाने यावर विचार केला नाही, आणि हा ठराव पारित करण्याचा आग्रह धरला.
दरम्यान शेतकऱ्यांकडून कोट्यावधी रुपये वसूल करणाऱ्या या विमा कंपनीचा विमा भरून घेतल्यानंतर कुठेही संपर्क करता येत नाही .त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणी येत असल्याच्या तक्रारी सर्व जिल्हा परिषद सदस्यांनी मांडल्या. यासंदर्भात पूर्वी शासन विमा भरून घ्यायचं आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळायची. तशा पद्धतीने पुन्हा शासनानेच पीक विम्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी आणि या कंपन्या बंद कराव्यात अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य जय मंगल जाधव यांनी केली.
हे आहेत विमा कंपनीचे पत्ते आणि प्रतिनिधी
रिलायन्स जनरल इन्शुरन्स, नरेश कॉम्प्लेक्स अंबड चौफुली जालना, भ्रमणध्वनी 96 57 87 87 93 मयूर 91 52 72 98 18 अवधूत शिंदे.
एचडीएफसी आर्गो, धनलक्ष्मी कॉम्प्लेक्स, भारत पेट्रोल पंपाजवळ अंबड रोड जालना. प्रतिनिधी आरिफ शेख भ्रमणध्वनी 97 65 47 16 46.
-दिलीप पोहनेरकर, edtv,9422219172