Advertisment
जालना जिल्हा

समान निधी वाटपावरून जि.प. सभेत गोंधळ; भाजपा सदस्यांचा ठिय्या;रात्री उशीरापर्यंत चालली सभा.

जालना- जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आज दुपारी दोन वाजता कै. यशवंतराव चव्हाण सभागृह मध्ये सुरू करण्यात आली. प्रारंभिक चर्चा झाल्यानंतर पाच वाजेच्या सुमारास ही सभा हळूहळू विषयपत्रिकेवर आली आणि त्यानंतर सुरू झाला तो गोंधळ.

15 व्या वित्त आयोगातून जिल्हा परिषद सदस्यांना देण्यात येणाऱ्या विकास निधी मध्ये सत्ताधाऱ्यांनी भेदभाव केला आणि विकास निधीचे कमी-जास्त वाटप केल्यामुळे भाजप सदस्य आक्रमक झाले.

डॉ. साबळे, शालिग्राम मस्के, अवधूत नाना खडके, गणेश बापू फुके ,सौ .पाण्डे सौ गंगासागर पिंगळे, आदि भाजप सदस्यांनी अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समोरच ठिय्या दिला. जोपर्यंत समान निधी वाटप होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहील असा आक्रमक पवित्रा घेतला. रात्री सव्वा आठ वाजेपर्यंत ही सभा सुरू होती. दरम्यान सत्ताधारी सदस्यांनी सभागृहाच्या बाहेर जाऊन विचार विनिमय केला आणि सव्वा आठ वाजता सर्व सदस्यांना समसमान म्हणजे 18 लाख रुपये प्रत्येकी असा विकास निधी देण्यात येईल असे जिल्हा परिषद अध्यक्ष उत्तमराव वानखेडे यांनी जाहीर केले त्यामुळे भाजप सदस्यांनी केलेले आंदोलन मागे घेण्यात आले.

-दिलीप पोहनेरकर, edtv,9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button