जालना जिल्हा

भैया, भाऊ, अण्णांणी केले गणरायाचे पूजन,

जालना -सुखकर्ता गणरायाचे आज ढोल ताशाच्या गजरात जरी नसले तरी शांतते मध्ये प्रत्येकाच्या घरात आगमन झाले. बच्चे कंपनीने मात्र उत्साहाच्या भरात संगीतावर ठेका धरला होता .बाप्पा सर्वांचाच लाडका त्यामुळे सर्वच पुढाऱ्यांनी वेळात वेळ काढून आपापल्या घरी गणरायाचे उत्साहात स्वागत केले.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आपल्या घरी दोन्ही मुलांसह गणरायाची स्थापना केली. जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल आणि नगराध्यक्षा सौ. संगीता कैलास गोरंट्याल यांनी मानाचा गणपती असलेल्या नवयुवक गणेश मंडळाच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली. माजी मंत्री तथा परतूर चे आमदार बबनराव लोणीकर यांनी देखील आपल्या भक्ती निवास येथे श्रींचे उत्साहात स्वागत केले. तर माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी संपूर्ण परिवारासह गणरायांचे जल्लोषात स्वागत केले .

दरम्यान जालना शहरातील मानाचा गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवयुवक गणेश मंडळाचे हे 74 वे वर्ष आहे .

आज या गणपतीच्या प्राणप्रतिष्ठेचा वेळी मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र आबड, सचिव अल्केश अग्रवाल, जयेश शाह,गौतमचंद आबड, दर्शित आबड, मयूर सावजी, श्रेनिक आबड, प्रकाश गोरंट्याल , निखिल आबड, जितेश तालुका, ओमकार भूतिया, डॉ ऐ पी पटेल, सुनील खर्डेकर, अनुराग बंदूकवाला, श्रीरंग पटेल, जावेद ताम्बोली .आदींची उपस्थिती होती.

–दिलीप पोहनेरकर,9422219172

Related Articles