आ.कुचे यांनी शासनाला 84 लाखांना फसविले -निकाळजे: हे सूडबुद्धीने केलेले आरोप -आ कुचे

जालना- बदनापूर चे आमदार नारायण कुचे यांनी सामान्य शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना स्वतःच्या नावावर लाटल्या आहेत. स्वतःच्या परिवारातील पत्नी, आई ,भाऊ ,भावजय या सदस्यांचा एक बचत गट तयार करून सामान्य शेतकऱ्यांना पोखरा योजनेचा लाभ न देता सोळा सदस्यांचा गट स्थापन करून कृषी विभागाची 84 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते सुधाकर निकाळजे यांनी केला आहे.
दरम्यान मानदेऊळगाव हे माझे स्वतःचे गाव आहे आणि पोखरा योजनेअंतर्गत हे गाव येते, जागतिक बँकेची योजना असल्यामुळे या योजनेचा मूळ हेतूच हा आहे की लोकप्रतिनिधींनी अशा प्रकारच्या योजना राबवून इतर गटांनाही प्रोत्साहित करावे. त्यामुळे या योजनेतून ही कामे केली आहेत. प्रत्यक्षात विकासावर न बोलता केवळ सूडबुद्धीने काहीतरी बोलायचे त्यामध्ये काही तथ्य नाही. असे स्पष्टीकरण आ. नारायण कुचे यांनी दिले आहे.
-दिलीप पोहनेरकर, edtv news 9422219172