Talukaजालना जिल्हा

धुणे धुण्यासाठी विहीरीवर गेलेल्या महिलेचा विहिरीत पडून मृत्यू ;बदनापूर तालुक्यातील घटना

बदनापूर – तालुक्यातील जवसगाव येथील येथील एक विवाहित महिला धुणे धुण्यासाठी विहिरीवर गेली होती. विहिरीला कठडे नसल्याने विहिरीत पडून तिचा दुर्दैवी अंत झाल्याची घटनाआज घडली.

बदनापूर तालुक्यातील जवसगाव येथील शितल संतोष बर्डे ही बावीस वर्षीय विवाहिता धुणे धुण्यासाठी आज (दि. 24 एप्रिल) दुपारी 2 च्या सुमारास कचरू आनंदा बनसोडे यांच्या विहिरीवर गेली होती. सदरील विहीरीचे बांधकाम झालेले नसल्याने धुणे धुताना ती विहिरीत पडली. ही बातमी गावकऱ्यांना समजताच मोठया संख्येने मदतकार्य करण्यात आले तथापि, तोपर्यंत या महिलेचा मृत्यू झाला असल्याची माहिती जवसगावचे सरपंच भरत गारखेडे यांनी दिली. या महिलेच्या पश्चात पती, 1 मुलगा, 1 मुलगी असा परिवार आहे. सदरील घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button